शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमडी रॉकसह नायजेरीयनला अटक

By admin | Updated: October 12, 2016 05:02 IST

अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवरात्रीदरम्यान उरणमध्ये धाड टाकून साडेतीन किलो गांजासह वंदना म्हात्रे या आरोपीस अटक केली आहे

नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवरात्रीदरम्यान उरणमध्ये धाड टाकून साडेतीन किलो गांजासह वंदना म्हात्रे या आरोपीस अटक केली आहे. सोमवारी रात्री कोपरखैरणे परिसरातून एम डी रॉकसह नायजेरीयन नागरीकास अटक केली आहे. एमडी ची तीन महिन्यातील दुसरी कारवाई आहे. नवी मुंबई अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जुनपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. अंमलीपदार्थ विरोधी विशेष पथकाने धडक मोहीम हाती घेवून शहरातील अनेक गांजा माफीयांना गजाआड केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत नवी मुंबई, तळोजा व पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. उरण तालुक्यामध्येही गांजा विक्री करणाऱ्यांना अटक केली असली तरी प्रत्यक्ष उरण शहरामध्ये अद्याप अंमलीपदार्थ विक्रेते पोलिसांच्या हाती आले नव्हते. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्येही अंमलीपदार्थांची विक्री होत असल्याची माहीती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी ७ आॅक्टोंबरला रांजनपाडा परिसरात सापळा रचून वंदना म्हात्रे या महिलेस गांजा विक्री करताना अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल साडेतीन किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले आहे. उरण शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थाचा साठा जप्त केला आहे. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद चव्हाण, पोलिस निरीक्षक माया मोरे, उपनिरीक्षक अमीत शेलार, राणी काळे व त्यांच्या पथकाने गांजासह इतर अंमलीपदार्थांचे अड्डेही उध्वस्त करण्यास सुरवात केली आहे. कोपरखैरणे परिसरामध्ये महाविद्यालयीन तरूणांना एक नायजेरीयन व्यक्ती एमडी पावडर पुरवत असल्याची माहीती मिळाली होती.यामुळे सोमवारी रात्री सेक्टर १ अ मधील शारदा विद्यालयाच्या समोर सापळा रचला होता. अमॅन्युएल शिकाबू बेंजामीन ही व्यक्ती तेथे एमडीची विक्री करण्यासाठी आली असताना त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५५ हजार रूपये किमतीचे ग्रॅम एमडी रॉक हस्तगत केले आहे. बेंजामीन हा जुनमध्ये व्यवसायीक व्हिसावर भारतामध्ये आला होता. या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचीही पोलिस चौकशी करत आहेत. या तिन महिन्यात दुसऱ्यांदा एमडी पावडर जप्त करण्यात आली असून पोलिस पथकाच्या कामगिरीची सर्वत्र कौतुक होवू लागले आहे. (प्रतिनिधी)