शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या महापौरांच्या ताफ्यात नवी कोरी इनोव्हा, ही तर पैशांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:38 IST

ही तर पैशांची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पालिकेच्या स्थापनेनंतर खरेदी केलेली होंडा सिटी गाडी बंद पडत असल्याने पनवेल महानगरपालिकेने महापौरांसाठी सुमारे २० लाखांची इनोव्हा क्रिस्टा गाडी खरेदी केली आहे. गुरुवार, ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या गाडीचा लोकार्पण सोहळा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पार पडला.

पनवेल महानगरपालिका बाल्यावस्थेत असल्याचे आपण वारंवार प्रशासन अथवा सत्ताधारी यांच्याकडून ऐकत असतो. एकीकडे पालिकेला मालमत्ता कराव्यतिरिक्त कोणतेही नवीन उत्पन्नाचे साधन नाही. मालमत्ता कराच्या नव्या प्रणालीमुळे अनेकांनी कर भरण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न मालमत्ता कराच्या कचाट्यात सापडले असताना अशा प्रकारे केवळ महापौरांसाठी २० लाख रुपये खर्चून नवीन गाडी घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वापरात असलेली गाडी वारंवार बंद पडत असल्याने नवी गाडी खरेदी करण्यात आल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले. मात्र होंडा सिटीसारखी गाडी दोन ते तीन वर्षांत बंदच कशी पडू शकते, असाही प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. पालिका मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.

ही तर पैशांची उधळपट्टीएकीकडे कोरोनाची महामारी त्यात मालमत्ता कराचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना महापौरांना लाखो रुपये खर्चून गाडी खरेदीची इच्छा निर्माण होणे हा पनवेलकरांचा अपमान आहे. अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी थांबली पाहिजे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल