शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांसाठी नेरुळ पूल ठरतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: March 10, 2017 04:25 IST

नेरुळ पुलाच्या दुरुस्तीकरिता पाडण्यात आलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भेगांवरून जाणाऱ्या भरधाव दुचाकींचे तोल जात असून यामध्ये एखाद्याचा बळीही

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई नेरुळ पुलाच्या दुरुस्तीकरिता पाडण्यात आलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भेगांवरून जाणाऱ्या भरधाव दुचाकींचे तोल जात असून यामध्ये एखाद्याचा बळीही जाण्याची शक्यता आहे; परंतु महिन्याहून जास्त कालावधीपासून या भेगा जैसे थे असून पुलाच्या दुस्तीचेही काम ठप्प आहे. सायन-पनवेल टोल कंपनीच्या निविदेपाठोपाठ रस्त्याचा व पुलाच्या कामाच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त होत आहे. याच सायन-पनवेल मार्गावर नव्याने बांधलेल्या शिरवणे येथील पुलाची प्रत्येक चार ते पाच महिन्यांनी डागडुजी करावी लागत आहे. तर पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात पुलावरील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. सायन-पनवेल मार्गावरील चौकाचौकांतली वाहतूककोंडी सुटावी व जलद रहदारी व्हावी, यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. अशातच नेरुळ येथील पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले आहेत. त्याकरिता पुलावर भेगा पाडण्यात आल्या आहेत. दुरुस्तीसाठी वापरले जाणारे डांबर घट्ट बसावे यासाठी या भेगा पाडण्यात आल्या आहेत; परंतु मागील महिन्यापासून हे काम ठप्प असल्यामुळे त्या भेगा मृत्यूचा सापळा ठरत आहेत. पुलावरील निम्याहून अधिक मार्गावर या भेगा आहेत. त्यावरून दुचाकी गेल्यास भेगांमुळे दुचाकीचे चाक डगमगून चालकांचा तोल जातो. अशा वेळी दुचाकीच्या जवळपास दुसरे एखादे वाहन असल्यास त्यांच्यात धडक बसण्याची शक्यता आहे. अथवा भेगांमुळे भरधाव दुचाकीचा तोल जाऊन एखाद्याचा बळीही जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही दुरुस्तीसाठी पाडलेल्या पुलावरील भेगा तशाच ठेवून कामाच्या ठेकेदाराकडून दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा रचण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून पुलाच्या निम्या भागात दुरुस्तीचे साहित्यही ठेवण्यात आलेले आहे. यामुळेही पुलावर वाहतूककोंडी होत आहे. तर पुलावर सुरू असलेल्या कामाची माहिती पुलाच्या सुरुवातीलाच फलकाद्वारे देण्यात आलेली नाही. यामुळे चौकातली वाहतूककोंडी टाळण्यासाठी थेट पुलावरून जाणाऱ्यांची पुलावरच कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणचे संभाव्य गंभीर अपघात टाळावेत, अशी मागणी सदर मार्गावरील वाहनचालकांकडून केली जात आहे.