शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रु ग्णालयांचा निष्काळजीपणा

By admin | Updated: March 11, 2016 02:38 IST

रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे.

कर्जत : रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे. हा जैविक कचरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उचलण्यास मनाई केली आहे, त्यांनी तशी तक्र ार नगरपरिषद कार्यालयात दिली आहे. या कामगारांचे आरोग्य यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना नगरपरिषद नोटीस बजावणार आहे. नागरी घनकचरा अधिनियम २००० व जैविक घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम १९८८ नुसार रुग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचीही जबाबदारी संबंधित रु ग्णालयाची आहे. कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील खाजगी रु ग्णालयात निर्माण होणारा कचरा संकलित करून विल्हेवाटीसाठी ठाणे येथे पाठविला जातो, असे असतानाही कर्जतमधील डॉ. घनश्याम नाझीरकर व डॉ. विनय सांगळे यांच्या रुग्णालयातील जैविक कचरा पेटीत टाकला जातो. ही घटना नगरपरिषदेच्या कामगारांनी उघड केली आहे. कर्जत नगरपरिषदेने गावातील कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे, त्यामुळे सकाळी ठेकेदाराची गाडी त्या त्या ठिकाणी फिरत असते. इमारतीच्या खाली ठेवलेल्या कचरा पेटीमध्ये ठेवलेला कचरा उचलण्याचे काम ते कामगार करीत असतात. यावेळी डॉ. नाझीरकर व डॉ. सांगळे या दोन रु ग्णालयांच्या आवारातून उचलण्यात येणाऱ्या कचरा पेटीमध्ये वापरलेल्या सिरींज सापडल्या आहेत. त्या कामगारांनी ही बाब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे आणि स्थानिक नगरसेविका सुवर्णा जोशी यांच्या निदर्शनास आणून दिली. आम्ही हा कचरा उचलणार नाही असे स्पष्ट सांगितले. ही रु ग्णालये हा जैविक कचरा कचरा पेटीमध्ये टाकत असल्याने या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.