शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

By admin | Updated: October 15, 2016 06:59 IST

बारामतीची वाट लावण्याचे वक्तव्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे

नवी मुंबई : बारामतीची वाट लावण्याचे वक्तव्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे वाशीत निदर्शने करण्यात आली. जानकर यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेलेली आहे, त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत असल्याची टीका प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत रासपाचे मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशीत निदर्शने करण्यात आली. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच मिळालेल्या मंत्रीपदाची हवा जानकरांच्या डोक्यात गेल्याची टीका नाईक यांनी व्यक्त केली, तर यामुळेच ते बेताल वक्तव्य करत असल्याचाही पलटवार त्यांनी केला.बारामतीची वाट लावण्याची भाषा करण्यापूर्वी तिथल्या विकासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलेले आहे हे जाणून घ्यावे असाही टोला त्यांनी मारला. बारामतीची वाट लावण्यासाठी जानकरांना १०० जन्म घ्यावे लागतील असाही टोला संजीव नाईक यांनी मारला. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, पक्षप्रतोद जयाजी नाथ, दिनेश पारेख, जब्बार खान यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)