शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड होणार !

By admin | Updated: February 23, 2016 02:25 IST

राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. जमिनी फ्री होल्ड करताना किती शुल्क आकारायचे, याचा सध्या सिडको अभ्यास करीत आहे.

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. जमिनी फ्री होल्ड करताना किती शुल्क आकारायचे, याचा सध्या सिडको अभ्यास करीत आहे. त्यामुळे जमिनी फ्री होल्ड करण्याच्या नवी मुंबईकरांच्या जुन्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईतील बहुतांशी जमिनी सिडकोने लिजवर दिल्या आहेत. ६0 वर्षांनंतर लिज कालावधी संपुष्टात येणार असून या जमिनींची मालकी पुन्हा सिडकोकडे जाणार आहे. सिडकोनिर्मित सदनिका उभ्या राहिलेल्या जमिनीचे लिज आजही सिडकोकडे आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे लिजचाच आर्थिक भुर्दंड येथील रहिवाशांना सोसावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर सिडकोने येथील जमिनी फ्री होल्ड कराव्यात अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती सिडकोने केली. १९९४ मध्ये नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली. त्यामुळे या विभागाच्या नियोजनाची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यानंतर सिडकोचे गृहप्रकल्प महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात आले आहेत. या गृहप्रकल्पांना महापालिका सोयी-सुविधा प्रदान करत आहे. गृहप्रकल्पांसाठी राज्य सरकारने कन्हेयन्स डीड मोहीम सुरू केली आहे. सदनिकाधारक जमिनीचे मालक व्हावेत, अशी यामागची शासनाची भूमिका आहे. मात्र नवी मुंबईतील बहुतांशी जमिनी सिडकोच्या लिजवर असल्याने कन्हेयन्स डीडच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. औरंगाबाद येथे सिडकोने गृहप्रकल्पांच्या जमिनी फ्री होल्ड केल्या आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील जमिनीही फ्री होल्ड कराव्यात, अशी मागणी सर्वप्रथम माजी खासदार संजीव नाईक यांनी लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. परंतु आता सरकारनेच लिजवर असलेल्या शासकीय जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा नवी मुंबईतील लाखो सदनिकाधारकांना होणार आहे.