शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रंगोत्सवाला होणार नैसर्गिक रंगांची उधळण

By admin | Updated: March 12, 2017 02:47 IST

इको फ्रेंडली सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढत असून बाजारात नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांच्या किमतीदेखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या

नवी मुंबई : इको फ्रेंडली सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढत असून बाजारात नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांच्या किमतीदेखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने या रंगांना चांगलीच पसंती मिळत आहे. आरोग्यदायी होळी आणि धूळवड साजरी करण्यासाठी विविध प्रकारांत तसेच सुगंधित रंग खरेदीसाठी उपलब्ध आहे.पारंपरिक रंगांबरोबरच हर्बल कलर, हर्बल गुलाल खरेदी करता येतील. लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा अशा विविध रंगांबरोबर हर्बल रंगांमध्ये चंदेरी व सोनेरी रंगही उपलब्ध आहेत. या धूळवडीसाठी वेलवेट प्रकारचे रंग लोकिप्रय आहेत. विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले हे रंग मऊ, मखमली असून, त्यांचा पोत हे खास आकर्षण आहे. नैसर्गिकरीत्या तयार केलेले व पर्यावरणपूरक रंग साधारण किमतीत उपलब्ध आहेत. हर्बल कलरव्यतिरिक्त यंदा फळांच्या फ्लेवरमध्ये रंग उपलब्ध असून, त्यात फ्रेश लेमन, ग्रीन अ‍ॅपल, स्ट्रॉबेरी, आॅरेंज इत्यादी प्रकारांचा पर्याय आहे. दोनशे रु पयांपासून पुढे हे रंग उपलब्ध रंगांचा पोत आणि फ्लेवरच्या आकर्षणाबरोबरच ही धूळवड सुगंधित करता येईल, यासाठी बाजारात सुगंधित रंगही उपलब्ध आहेत. बाजारात असलेले रंग स्प्रे, ट्यूब, पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. रंगांच्या किमती वाढलेल्या असल्या, तरी रंगांमध्ये असलेले नावीन्य यामुळे रंग खरेदी जोरात असल्याचे विक्रे त्यांचे मत आहे. प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्यांवर कारवाई करारंगोत्सवासाठी पाण्याचे फुगे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्लास्टिक पिशव्या विकणारा विक्रेता आढळल्यास त्या दुकानदाराकडून दंडवसुली करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.बच्चे कंपनींसाठी पिचकाऱ्याया रंगपंचमीच्या सणासाठी बच्चे कंपनीने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, चायनामेड पिचकाऱ्या खरेदी करण्याकडे बच्चे कंपनीचा कल दिसून येतो. बच्चे कंपनीची खासियत असलेल्या या ‘वॉटर गन्स’ची पाण्याची क्षमता वाढली आहे. ३५०पासून ते १५०० रु पयांपर्यंत या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. छोटा भीम, डोरेमॉन, मिनी-मिकी, टॉम कॅट, अँग्री बर्ड्स, निन्जा, बेन टेन अशा कार्टुन्सच्या आहेत. पाठीवर दप्तर किंवा सॅकसारख्या टांगता येतील अशा पिचकाऱ्या १०० रु पयांपासून पुढे खरेदी करता उपलब्ध आहेत.