शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीचा जिल्हा परिषदेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा

आविष्कार देसाई , अलिबागजिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे तेथून निर्माण होणारा कर रूपातील पैसा आता जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा न होता त्या त्या नगरपंचायतीच्या खात्यात जमा होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेला होणारी ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एकतर ग्रामपंचायतींच्या इमारतीमध्ये थाटलेली नगर पंचायतींची कार्यालये काढून त्यांना भाडेतत्त्वावर द्यावी लागतील अथवा उत्पन्न वाढीसाठी अन्य बाबींचा विचार करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत याबाबत विचार करण्यात आला होता. जिल्हा परिषदेने खरोखरच असे पाऊल उचलले तर खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा आणि पोलादपूर या पाच नगरपंचायतींना आपापले कार्यालय थाटण्यासाठी नवीन जागेचा विचार करावा लागणार आहे. सध्या नगरपंचायतींकडे कार्यालयाबाबतचा कोणताच सेटअप नाही. रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प भले कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असला, तरी ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदेचे प्रमुख अंग आहे. तेच नगरपंचायतींच्या रूपाने जिल्हा परिषदेपासून वेगळे झाले आहे. त्या त्या ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेला विविध करांच्या स्वरूपात पैसा मिळत होता. त्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे. सध्या खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा या ठिकाणी विकासकामे सुरू झाली आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडोर तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, दिघी पोर्ट, रेल्वेचा विस्तार, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचा विकास अशा विविध माध्यमांतून तेथे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प झपाट्याने उभे राहत आहेत. त्यामुळे तेथे रिअल इस्टेटच्या मार्केटला प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. येथे होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांवरचे मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला प्राप्त व्हायचे, मात्र आता त्याला मुकावे लागणार आहे. त्याचप्रमाणे इतर कररूपाने मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागणार आहे. निर्माण होणारी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला उत्पन्नवाढीचे विविध मार्ग चोखाळावे लागणार आहेत.