शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मुस्लिम मोर्चात मराठा अन मराठा मोर्चात मुस्लिम समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 03:12 IST

राज्यात मराठा समाज शांतपणे आणि शिस्तबद्धपणे मोर्चे काढून मागण्या मांडत आहेत. ते कोणत्याही समाजाला लक्ष करीत नाहीत

ठाणे : राज्यात मराठा समाज शांतपणे आणि शिस्तबद्धपणे मोर्चे काढून मागण्या मांडत आहेत. ते कोणत्याही समाजाला लक्ष करीत नाहीत. ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण व अ‍ॅट्रासिटी रद्द करण्याची ते मागणीही करीत नाहीत. तर, त्याचा त्रास होऊ नये, अशी माफक अपेक्षा धरत आहेत. त्यामुळे एक -दोघांच्या बोलण्याने अ‍ॅट्रासिटी रद्द होणार नाही. महाराष्ट्रातील मराठा मोर्चामध्ये मुस्लीम आणि मराठ्यांमधील स्नेह वृद्धींगत होताना दिसत आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाजू असून महादेव जानकर यांच्यासारखे नेते दिशाभूल करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी मुंब्रा येथे मोर्चा आयोजिला आहे. या मोर्चात मराठा, ओबीसी आणि क्षत्रीय समाज सहभागी होणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रीयन मुस्लीम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मराठा खान, मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फिरोज मासुलदार, महाराष्ट्र पुरोगामी समाज संघटनेचे आसद चाऊस, मराठा क्र ांती मोर्चाचे संयोजक रमेश आंब्रे, क्षत्रीय समाजाचे एन.एम. सिंह, किमान वेतन आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.७ आॅक्टोबरला मुंब्रा येथील दारु ल फलाह मशीद ते मुंब्रा रेल्वे स्टेशन असा हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी, मराठा समाजाचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. तर, १६ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चेत मुस्लीम समाजाचे लोकही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लीम आणि मराठा समाज स्वतंत्र आणि वेगवेगळे आरक्षण मागत आहे. मात्र, महादेव जानकर यांच्यासारखे नेते चुकीची विधाने करु न तेढ निर्माण करीत आहेत. मराठा मोर्चामुळे दलित-ओबीसी घाबरले आहेत, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, हा त्यांचा वैयिक्तक आभास आहे. मराठा मोर्चा कोणाला घाबरवण्यासाठी काढलेले नाहीत. मराठा मोर्चामुळे दलित आणि ओबीसींमध्ये घाबरण्यासारखी परिस्थितीही नाही. या समाजांमध्ये आरक्षणासारख्या मुद्यावर तेढ नाही.