शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये मुस्लिमांची भव्य रॅली

By admin | Updated: February 25, 2016 04:16 IST

पोलिसांनी आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी अभियानाला पाठिंबा दर्शवत मुस्लीम बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ येथे निघालेल्या या

नवी मुंबई : पोलिसांनी आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी अभियानाला पाठिंबा दर्शवत मुस्लीम बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ येथे निघालेल्या या रॅलीमध्ये सुमारे पाच हजार मुस्लीम बांधव, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते.भारतावर आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा भारतवासीयांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. परंतु भारतात राहणारे मुस्लीम हे देखील मनाने भारतीय असून इतरांप्रमाणेच त्यांनाही भारत प्रिय आहे. यामुळे दहशतवादाशी भारतातील प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचा संबंध जोडल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात. परंतु जरी धर्माने मुस्लीम असलो तरी आमचाही दहशतवादाला तीव्र विरोध आहे हे नवी मुंबईतील मुस्लीम बांधवांनी दाखवून दिले आहे.परिमंडळ १ पोलिसांच्या वतीने दहशतवादविरोधी सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने नेरुळ पोलिसांच्या सहयोगातून दहशतवाद विरोधी मुस्लीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रतिष्ठित मुस्लीम बांधवांसह ५ हजारहून अधिक पुरुष, महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या प्रत्येकाकडून दहशतवादाला धर्म नाही, दहशतवाद थांबवा- देश वाचवा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. या रॅलीची सांगता डी.वाय. पाटील सभागृहात करण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, इमलराज, अलीमियॉ शमसो, आलम बाबा यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाशी येथे दहशतवादावर सावधानता हीच गुरुकिल्ली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास रिक्षा, टॅक्सी, टेंपो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितांना उपआयुक्त शहाजी उमाप, आरटीओ अधिकारी संजय धायगुडे, निवृत्त सहाय्यक आयुक्त धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले. चित्रपटगृहे, हॉस्पिटल, रुग्णवाहिका, मॉल यांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपआयुक्त प्रशांत खैरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते. पोलिसांसाठी देखील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गुन्ह्यांचा तपास कसा करावा, पुरावे कसे जमवावे अशा विविध विषयांवर निवृत्त सहाय्यक आयुक्त ताजणे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.