शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड नगरपरिषद निवडणुकीची तयारी

By admin | Updated: October 4, 2016 02:37 IST

मुरुड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरु वात केली असून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत

मुरुड/नांदगाव : मुरुड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरु वात केली असून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र असून शहरावर कोणाचे मजबूत प्राबल्य नसल्याने प्रत्येक पक्ष मजबूत स्थिती प्राप्त करण्यासाठी झटत आहे. लवकरच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार असून प्रचाराला दिवस सुद्धा कमी पडू नये म्हणून जो तो आतापासून प्रचारात मग्न झालेला दिसून येत आहे. गत वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले होते.त्यांचे १२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु सुखाचे हे बलस्थान फार काळ टिकवता न आल्याने त्याच्याच सहा नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून आपल्या मर्जीचा नगराध्यक्ष बसवला होता. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून दूर राहून लोकांच्या विकासकामापासून दूर राहिला आहे. आता पुन्हा सत्ता आणणे म्हणजे बिकट बनले आहे. तर याच पक्षातले सहा नगरसेवक यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्रतेची केस सुरु असून त्याचा निकाल प्रलंबित असल्याने या निकालाकडे सुद्धा लोकांचे लक्ष वेधले आहे, याबाबीची सुद्धा लोक चर्चा करताना आढळत आहेत.तालुका चिटणीस मनोज भगत हे प्रत्येक दिवस निवडणूक पार्श्वभूमीवर चिंतन करून अगदी काळजीपूर्वक पावले उचलताना दिसत आहेत. बंडखोर सहा नगरसेवक हे या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना हा पक्ष कोणाबरोबर युती करणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सहा बंडखोर नगरसेवक यांचा कल शिवसेनेकडे असल्याचे बोलले जात आहे. आता सर्व पक्षाचे नगराध्यक्ष आरक्षणावर लक्ष असून लवकरच आरक्षण जाहीर होताच नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. मुरु ड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष सुद्धा लढवणार आहे.(वार्ताहर)