शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

खून, लूटमार करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: April 21, 2016 02:54 IST

कल्याणच्या खडकपाडा भागातील एका तरुणीसह सुरक्षारक्षकाचा खून करुन लॅपटॉप आणि मोबाईल लुटणाऱ्या चार जणांच्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती

ठाणे: कल्याणच्या खडकपाडा भागातील एका तरुणीसह सुरक्षारक्षकाचा खून करुन लॅपटॉप आणि मोबाईल लुटणाऱ्या चार जणांच्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने जेरबंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार आणि कोयत्यासह लॅपटॉप तसेच सोनसाखळी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे टोळीचा सूत्रधार अवघ्या १६ वर्षांचा असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.कल्याणचे रहिवासी असलेले नितिन वाघे (१९), नितेश उर्फ नित्या भोईर (२०), रवींद्र उर्फ रवी वाघे (२०) आणि त्यांचा अल्पवयीन म्होरक्या अशी याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या अल्पवयीन असूनही हल्ला करतांना तो अग्रभागी असायचा. अत्यंत कु्ररतेने त्यांनी या दोन हत्या केल्या. या अल्पवयीन म्होरक्यावर नव्या २०१५ च्या कायद्यानुसार प्रौढ आरोपींप्रमाणेच खटला दाखल करण्याची विशेष परवानगी न्यायालयाकडे मागणार आहेत. ८ एप्रिल रोजी पहाटे १.३० वा. च्या सुमारास शहाडच्या मोहने रोडवरील सिद्धीविनायक डेव्हलपर्स या कॉम्पलेक्समधील सुरक्षारक्षक दीपककुमार महतू आणि संजय यादव यांच्यावर दोन अनोळखींनी खूनाचा प्रयत्न केला होता.तर ९ आणि १० एप्रिलच्या मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास शहाड भागातील लेबर कॅम्प येथील दीपक भोईर या सुरक्षारक्षकाचीही निर्घृणपणे वार करुन हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचा मृतदेह लेबर कॅम्पमधील वाळूच्या ढिगाऱ्यात गाडला होता. त्याच दिवशी म्हणजे १० एप्रिलच्या पहाटे ३ ते ४ वा. च्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या शहाडमधील मंगेशी पॅराडाईज या ठिकाणी मर्क्युरी बल्बची चोरी करणाऱ्यांना अडविणाऱ्या संजय सिंग (२८)या सुरुक्षारक्षकाच्या कपाळावर शस्त्राने वार करुन एका टोळक्याने पलायन केले होते. १४ एप्रिलच्या पहाटे १.३० वा. च्या सुमारास शहाड भागातीलच साईराम सोसायटीमधील एका घरात शिरुन झोपलेल्या प्रिया दरवडे (२२) हिच्या डोक्यावर वार करुन खून करुन सोनसाखळी, सोन्याचा हार आणि मोबाईल लुटला होता. या चारही प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले होते. (प्रतिनिधी)