शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण तालुक्यात पालिका हवी

By admin | Updated: February 17, 2016 02:23 IST

पनवेल महानगरपालिका होणार की नाही, याबाबत शहरातील नागरिकांना प्रशासन संभ्रमात टाकत असून, अगोदर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी

तळोजा : पनवेल महानगरपालिका होणार की नाही, याबाबत शहरातील नागरिकांना प्रशासन संभ्रमात टाकत असून, अगोदर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. सिडकोने या परिसरात भविष्यात नवी मुंबई विमानतळ, नैना, महानगरपालिका, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी यासारख्या सुविधांचे गाजर दाखवले आहे. महानगरपालिका होण्याला आमचा विरोध नाही, मात्र यातील एकच निर्णय घेणे गरजेचे आहे. संपूर्ण तालुक्याचा समावेश या महानगरपालिकेत करावा, असे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी सांगितले. पनवेल ‘महानगरपालिका : फायदा की तोटा?’ या विषयाला अनुुसरून गोल्डन ग्रुप, पनवेलच्या वतीने सर्वपक्षीय महाचर्चेचे आयोजन वासुदेव बळवंत फडके सभागृहात करण्यात आले होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या चर्चासत्राची धुरा सांभाळली.भाजपाच्या वतीने जयंत पगडे उपस्थित होते. या महाचर्चेत जगदीश गायकवाड, तळोजा असोसिएशनच्या जयश्री काटकर, बाळाराम पाटील, महेंद्र घरत, के. के. म्हात्रे, शिवसेना नेते चंद्रशेखर सोमन, एमसीएचआयचे विलास कोठारी, पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, कफ फोरमचे अध्यक्ष अरु ण भिसे आदी मान्यवर या सभेत सहभागी झाले होते.चचेत शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी यावेळी संपूर्ण पनवेल तालुक्याचा समावेश महानगरपालिकेत करण्याची मागणी केली, तर कफचे अरु ण भिसे यांनी कुणीतरी येतो आणि रस्ता खोदून पाइपलाइन टाकतो, ही पनवेलची शोकांतिका असून ही मानसिकता बदलायला हवी. पनवेलला भेडसावणाऱ्या पाणीसमस्येकडे शासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेलकरांसाठी महापालिका पाण्याचा स्रोत म्हणून उपाययोजना करणार आहे का, या मागणीच्या व पनवेलच्या समस्येच्या आधारे ही महाचर्चा रंगली. काहीही करा, पण येथील शेतकरी व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी तत्पर असणारी व्यवस्था करा. सिडकोने आधी या संपूर्ण क्षेत्राचा विकास करा. महापालिका करा, पण त्याची आता गरज आहे का? पनवेलच्या सोयीसुविधांवर भर देत स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावे. निवांत महानगरपालिका करण्याचा निर्णय घेतला तर काही वावगे ठरणार नाही, असे शेकापचे चिटणीस बाळाराम पाटील म्हणाले. (वार्ताहर)