शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

By admin | Updated: September 4, 2016 03:30 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह पालिका प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात एकूण ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवागनी देण्यात

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह पालिका प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात एकूण ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवागनी देण्यात आलेली असून, रविवारीदेखील ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, तर दीड दिवसांपासूनच विसर्जनाला सुरुवात होणार असल्यामुळे सर्वच विसर्जन स्थळांवरील यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे.शहरात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा, याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात समाजकंटकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावलेला आहे. शहरातील मुख्य ठिकाणी, प्रसिद्ध मंडळे यासह विसर्जन स्थळ व मार्गावरदेखील रात्रंदिवस पोलिसांचा बंदोबस्त आहे. या दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्याही मुसक्यादेखील पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यानुसार, पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात परिमंडळ १ मध्ये सुमारे दीड हजार, तर परिमंडळ २ मध्ये १ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर कार्यरत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शहरातील प्रत्येक गैर हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. दहशतीसाठी वाहनांचा वापर होऊ नये, याकरिता ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची झडाझडती सुरू करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ३८४ मंडळे परिमंडळ १ मध्ये तर १४६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे परिमंडळ २ मधील आहेत. पोलीस व स्थानिक प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने एक खिडकी संकल्पना राबवून मंडळांकरिता परवानगी प्रक्रिया सोपी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे ना हरकत मिळवण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करावी लागणारी धावपळ मागील वर्षापासून कमी झाली आहे.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोपर खैरणे विभागात सर्वाधिक ८७ सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याशिवाय बेलापूर विभागात ५१, नेरुळ विभागात ५९, वाशी विभागात ४१, तुर्भे विभागात ३४, घणसोली विभागात ३५, ऐरोली विभागात ४४, तर दिघा विभागात २४ मंडळांना पालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेली आहे. गतवर्षापासून मंडळांकडून अडवला जाणारा रस्ता पोलिसांच्या प्रयत्नाने मोकळा झालेला आहे. त्यानुसार, रहदारीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणीच सार्वजनिक मंडळांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत, परंतु घणसोली विभाग हा अद्याप सिडकोच्या ताब्यात असल्यामुळे, त्या ठिकाणच्या काही गणेशोत्सव मंडळांनी जागेची परवानगी न घेताच, मंडप उभारलेले आहेत, तर प्रत्येक वर्षी तयार होणाऱ्या अशा नवनवीन मंडळांमुळे परिसरात वाद निर्माण होत आहेत. अशा विनापरवाना मंडळांवर पालिकेने कारवाईची मागणी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)गणेशोत्सव काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तर पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकड्यादेखील दाखल झालेल्या आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गैर हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. गर्दीचा गैरफायदा घेत, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी करणाऱ्या चोरट्यांनादेखील आवर घालण्यासाठी जागोजागी साध्या गणवेशातील पोलीसदेखील कार्यरत केले जाणार असल्याचे उपायुक्त प्रशांत खैरे व विश्वास पांढरे यांनी सांगितले.