शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात साथीचे आजार कमी होत असल्याचा महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:20 IST

मलेरियाचे वर्षभरात फक्त ९२ रुग्ण । पाण्यामुळे उद्भवणाऱ्या रुग्णसंख्येतही घट

नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महानगरपालिकेने मात्र शहरात प्रत्येक वर्षी साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. गत वर्षभरामध्ये मलेरियाचे फक्त ९२ व पाण्यामुळे उद्भवणाºया आजाराचे ९६ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजारही वाढतात. नवी मुंबईमध्येही प्रत्येक वर्षी डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. तापामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महापालिका व खासगी रुग्णालयामधील रुग्णसंख्येत जवळपास दीडपट ते दुप्पट वाढ होत असते; परंतु महापालिका प्रशासनाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालामध्ये दिली आहे. शहरामध्ये २०१४-१५ मध्ये मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले होते. गतवर्षी फक्त ९२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीमध्ये डेंग्यूचे रुग्ण ७६ वरून चारवर आले आहेत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये डास अळी फवारणी सुरू केली आहे. पाणी साठणाºया ठिकाणी गप्पी मासे सोडण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाचा संशयित रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेल्या परिसरातील १०० घरांचीही तपासणी केली जात आहे. या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पिण्याचे पाणी चांगले असल्यामुळे पाण्यापासून उद्भवणाºया रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये पाण्यामुळे ३५१ जण आजारी पडले होते. गतवर्षी रुग्णांची संख्या ४० वर आली आहे.शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याचे निदान व उपचार करण्यासाठी २७ पडताळणी केंद्र आहेत. २३ नागरी आरोग्य केंद्र, ३ सर्वसाधारण रुग्णालये व माताबाल रुग्णालयातही यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले असून शहरातील कर्मचारी, मुख्याध्यापक, खासगी रुग्णालयातील कर्मचाºयांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.