शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे महापालिका मुख्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 00:10 IST

सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केले.

नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केले. सचिवांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. प्रभाग समित्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचे कामकाज म्हणून प्रभाग समित्यांच्या रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. परंतु तहकूब सभेमध्ये तातडीचे कामकाज घेता येत नसल्याचा आक्षेप शिवसेनेचे नामदेव भगत व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी घेतला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सचिव चित्रा बाविस्कर यांनी उपमहापौरांचा माईक घेऊन प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. विरोधकांनी नियमांची माहिती मागितल्यानंतरही दिली नाही. दिघा, ऐरोली व घणसोलीमधील प्रभाग समितीची रचना राष्ट्रवादी काँगे्रसला फायदेशीर होईल अशाप्रकारे केली आहे. प्रभाग समित्यांची रचना करताना भौगोलिक रचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आणि पक्षपातीपणा केल्याचाही आरोप नगरसेवकांनी केला. महापालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. सचिवांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सचिवांच्या पक्षपातीपणाची तक्रार करण्यात आली. नियमबाह्य कामकाज सुरू असून सर्व कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही तर शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. आयुक्तांनी प्रभाग समितीची रचना व इतर कामकाज नियमाप्रमाणे झाले आहेत का, याची माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, शिवराम पाटील, मनोज हळदणकर, सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, रतन मांडवे, सुमित्र कडू, समीर बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.