शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धविहारवरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन

By admin | Updated: February 17, 2017 02:22 IST

सिडकोने अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत विविध नोडमध्ये कारवाई सुरू असून स्थानिकांच्या

पनवेल : सिडकोने अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत विविध नोडमध्ये कारवाई सुरू असून स्थानिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी अनधिकृतपणे बांधण्यात आलेले खारघर गावातील बौद्धविहार जमीनदोस्त करण्यात आले. मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत खारघरमधील सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन विरोध केला. शिवाय कारवाईच्या घटनेच्या निषधार्थ गुरुवारी सिडकोवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. गावठाण हद्दीत सिडकोने अद्यापही २०० मीटरची परिसीमा निश्चित केली नसल्याने परिसरातील गावांतून सिडकोच्या कारवाईला मोठा विरोध होत आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई हा सिडकोच्या कारवाईचा एक भाग आहे. मात्र ऐन परिक्षांच्या काळात घरांवर, गृहसंकुलांवर कारवाई करण्यात येत असल्याने, जायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको २००९ नंतरची सर्व धार्मिक स्थळे पाडणार असल्याचे सांगते. मात्र नवी मुंबई वसविताना अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेची स्थापन करण्यात आली. त्यांची कागदोपत्री माहिती उपलब्ध नसली तरी गुगल मॅपवर अशी मंदिरं स्पष्टपणे दिसतात. तरी देखील त्यांना नोटीसा धाडल्या जात असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे सिडकोने गरजेपोटी घरासंदर्भात काही घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही कोणती ठोस भूमिका न घेता प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई केली जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांसह सर्वच घटकामध्ये मोठी नाराजी आहे. खारघर गावातील लुबिनी बौद्धविहार हे गावठाणापासून अवघे काही मीटर अंतरावर आहे. शिवाय कांबळे कुटुंब हे प्रकल्पग्रस्त असताना सिडकोने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. गावठाणापासून २०० मीटरची सीमा निश्चित केल्याशिवाय सिडकोने या बांधकामावर कारवाई करू नये, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे . खारघर शहरामध्ये या कारवाईचे तीव्र पडसाद पहावयास मिळाले. जवळ जवळ ८० टक्के दुकाने गुरुवारी बंद होती. सिडको भवनावर काढलेल्या या सर्वपक्षीय मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्यासह या वेळी शेकापचे माजी उपसरपंच संजय घरत, गुरु नाथ गायकर, आरपीआयचे नरेश जाधव, कल्पेश तोडकर, सुशील महाडिक, राजाराम पाटील, भाजपाचे ब्रिजेश पटेल, लीना गरड, बिना गोगरी, मिलिंद ठोकळे, सुरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, अभिमन्यू पाटील, कीर्ती नवघरे आदी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)