शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मॉकड्रीलमुळे खारघरमध्ये अफवांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:28 IST

आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याकरिता पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रील करण्यात येते.

पनवेल : आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याकरिता पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रील करण्यात येते. नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी मॉकड्रील केले जाते. खारघरमध्ये गुरुवारी येथील डीमार्टमध्ये मॉकड्रील करण्यात आले. मात्र उपस्थितांना यासंदर्भात काहीच माहीत नसल्याने काही काळातच शहरात अफवांचे लोन पसरले. डीमार्टमध्ये आतंकवादी घुसले, शहरात आतंकवाद्यांनी हल्ला केलाय, आतंकवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवले असल्याच्या अफवांनी जोर धरला होता.गुरु वारी सकाळी ११.३० वाजता मॉकड्रीलला सुरु वात झाली. डीमार्टमधील नागरिकांना कोणत्याही प्रकाराची माहिती न देता डीमार्टचे शटर अचानक बंद करण्यात आले. यावेळी बंदूकधारी शीघ्र कृती दलाचे कमांडो, पोलीस अधिकारी, बॉम्ब स्कॉड, अग्निशमन कर्मचाºयांनी डीमार्टमध्ये शिरकाव करीत काही संशयितांना बाहेर काढले. या प्रकाराची काहीच माहिती नसल्याने घाबरलेल्या नागरिकांनी आपल्या घरी, मित्रांना यासंदर्भात फोनवरून माहिती देत खारघरमध्ये आतंकवादी घुसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचा फौजफाटा, कमांडोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने झपाट्याने ही बातमी सर्वत्र पसरल्याने शहरात अफवांना उधाण आले. जवळजवळ दीड तास चाललेल्या या मॉकड्रीलची सांगता दुपारी १ च्या सुमारास झाल्याने उपस्थितांना याबद्दल माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरक्षेसंदर्भात पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणा किती सतर्क आहेत याकरिता मॉकड्रीलचे आयोजन करण्यात येत असल्याचे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी सांगितले. खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या मॉकड्रील करण्यात आले.