शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

एमजेपीच्या जलवाहिन्यांना गळती

By admin | Updated: March 1, 2016 02:51 IST

पनवेल, उरण जेएनपीटी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला गळती लागलेली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे

वैभव गायकर, पनवेलपनवेल, उरण जेएनपीटी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला गळती लागलेली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू असून या पाण्याची चोरी देखील होत आहे. चिंचपाडा, करंजाडे, वडघर गावाजवळ ही पाण्याची गळती सुरू असून, लाखो लिटर पाणी यामुळे वाया जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. पनवेलमध्ये देखील दिवसाआड पाणी सोडले जात आहे. नागरिकांमध्ये पाणी बचतीसाठी विविध प्रकारची जनजागृती केली जात आहे. मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होवून सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी याठिकाणी फिरकतही नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पनवेल नगरपरिषद, जेएनपीटी, सिडको आदींना पाणीपुरवठा केला जातो. सर्वच प्राधिकरणांनी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाणीकपातीला सुरुवात केली आहे. मात्र मागील महिनाभरापासून याठिकाणच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे याठिकाणाहून ये-जा करणारे नागरिक देखील संताप व्यक्त करीत आहेत.करंजाडे परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईट्सवरील मजूर देखील याच ठिकाणी येवून कपडे, भांडी धूत असतात. याठिकाणाहून ये-जा करताना याठिकाणच्या पाण्यात सर्रास मजूरवर्ग आंघोळ करताना नजरेस पडतात. पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली दिसून येते. ही जलवाहिनी बंद जरी केली तरी अवघ्या काही तासात पुन्हा या वाहिनीला गळती लागते. जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे गळती लागत असते, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गळतीमागे काही समाजकंटक जबाबदार असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.