शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या कारभारात गैरव्यवहार !

By admin | Updated: October 15, 2016 07:03 IST

मागील पाच वर्षांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीचा ठेकेदार वेगळा व बिले दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने देण्यात आली आहेत. साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार

नवी मुंबई : मागील पाच वर्षांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीचा ठेकेदार वेगळा व बिले दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने देण्यात आली आहेत. साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा संशय काँगे्रस नगरसेविका मीरा पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनीही आक्षेप घेतल्यामुळे सभापतींनी पाच वर्षांमधील साहित्य खरेदीच्या कामाचे विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश व इतर वस्तू पुरविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना काँगे्रस नगरसेविका मीरा पाटील यांनी यापूर्वीच्या साहित्य खरेदीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वी शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम ज्या ठेकेदारांना दिले त्याच्या नावाने बिलाचा धनादेश काढलेला नाही. दुसऱ्याच ठेकेदारांच्या नावाने बिले देण्यात आली आहेत. नियमबाह्यपणे कामकाज झाले आहे. यावर्षी दिवाळी जवळ आली तरी मुलांना साहित्य पुरविण्यात आलेले नाही. १२ पैकी सहा वस्तूंच्या खरेदीचा प्रस्ताव चर्चेसाठी आणला आहे. साहित्य खरेदीच्या यापूर्वीच्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनीही यापूर्वीच्या साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. यावर्षी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने निविदा आली असेल तर यापूर्वी जादा दराने साहित्य का खरेदी केले, जादा पैसे कोणाच्या खिशात जात होते याची चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. भाजपा नगरसेवक दीपक पवार, प्रशांत पाटील यांनीही पूर्वीच्या साहित्य खरेदीविषयी चौकशीची मागणी केली असून यंदा निविदेसाठी उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सभापती शिवराम पाटील यांनीही प्रशासनास धारेवर धरले. दिवाळी जवळ आल्यानंतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव आणल्याविषयी नाराजी व्यक्त केली. ज्यांनी साहित्य पुरविण्याचा ठेका घेतला बिलही त्यांच्याच नावे निघाले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीच्या नावे बिले काढली असतील तर ते चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी निदर्शनास आणलेल्या गोष्टी गंभीर आहेत. यापूर्वी केलेल्या साहित्य खरेदीमध्ये गैरप्रकार झाला की नाही हे तपासण्यासाठी विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे. आठ दिवसांत याविषयीचा अहवाल तयार करून तो सभागृहासमोर मांडण्यात यावा असे आदेश दिले आहेत. यावर्षीच्या साहित्य खरेदीमध्ये १२ वस्तू पुरविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. पण सहा वस्तू घेण्याविषयी प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला आहे. याविषयी सदस्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्याचे निरसन करून पुन्हा हा प्रस्ताव सभागृहासमोर घेवून यावा अशा सूचना प्रशासनासकेल्या.