शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:19 IST

आई - वडिलांच्या निधनानंतर आजीसह स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची

नवी मुंबई : आई - वडिलांच्या निधनानंतर आजीसह स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नोकरीवरून घरी पायी जात असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने तिच्यासोबत हे कृत्य करून पळ काढला.दिघा येथे राहणाºया १६ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याठिकाणी ती वृध्द आजीसोबत राहायला आहे. परिस्थितीशी लढा देत कसेबसे दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती रबाळे एमआयडीसीमध्ये एका ठिकाणी कॅशिअर म्हणून काम करायची. यादरम्यान घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत ती पायी ये-जा करायची. यावेळी एक रिक्षाचालक तिच्यावर नजर ठेवून होता. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने घटनेच्या काही दिवस अगोदर तिला रिक्षातून लिफ्ट दिली होती. त्यानुसार घटनेच्या दिवशी देखील त्याने लिफ्टच्या बहाण्याने तिला रिक्षात बसवले. मात्र दिघ्याच्या दिशेने जाण्याऐवजी रिक्षा अज्ञात ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर घटनेची माहिती कोणाला दिल्यास ठार मारण्याची धमकी देवून घरी सोडण्यासाठी तिला रिक्षात बसवले. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर तिला पुन्हा चालकाच्या हालचालीवर संशय आल्याने चालत्या रिक्षातून उडी मारून तिने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी सदर रिक्षाचालकाची माहिती मिळवली आहे. मात्र त्याने घरातून पळ काढल्यानंतर सतत मुक्कामाचे ठिकाण बदलत असल्याने पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. परंतु घडलेल्या प्रकारामुळे कौटुंबिक परिस्थितीशी सामना करणाºया पीडित मुलीपुढे हे संकट कोसळले आहे.