शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीवर पुरुषांची मक्तेदारी

By admin | Updated: October 1, 2014 23:12 IST

रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही.

आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
राजकारणात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले असले, तरी रायगड जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही सक्षम महिला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे राजकीय पक्ष महिला आरक्षणाच्या निव्वळ गप्पाच मारतात हे त्यानिमित्ताने अधोरेखित होते.
रायगड जिल्हय़ात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजपा असे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. या पक्षांनी आपापल्या संघटनात  वाढ करताना पुरुषांना सुरुवातीला स्थान दिले होते. त्यानंतर अलिकडच्या काळामध्ये महिलांचेही संघटन वाढविण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे  दिसून येते. महिलांची ताकद ओळखून प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांच्या विविध संघटना उभ्या केल्या आहेत. या संघटनांचा वापर व्होट बँकेसारखा केला जात आहे.  महिलांनी पुढे येण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध उपाय योजना आखतानाच वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. 
सर्वच क्षेत्रमध्ये महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. राजकारणातही महिलांनी पुढे यावे यासाठी महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदार संघातील  प्रमुख राजकीय पक्षांना सक्षम महिला उदेवार सापडला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या राजकीय पक्षांच्या भूमिकेवर महिलांनीच संशय निर्माण केल्यास काहीच वावगे ठरणारे नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाच महिलांना पुढे आणण्याची आहे. आताच्या होणा:या निवडणुका या महत्त्वपूर्ण असून अटीतटीच्या आहेत. राजकारणात पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. स्ट्राँग आणि सिनियर उमेदवारांची गरज आहे. येत्या काळात महिलांना निश्चितच संधी मिळेल याबाबत आशावादी आहोत.
-आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, कोकण संघटक
 
महिला उमेदवारीचा राजकीय इतिहास 
मनोरमा भिडे( काँग्रेस,अलिबाग -1957), शांता कांडकर ( संयुक्त महाराष्ट्र समिती,माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन-1962), मीनाक्षी पाटील (शेकाप, अलिबाग-1995 ते 2क्क्9) रेहाना उंडीरे ( शेकाप,श्रीवर्धन- 1995), मनीषा पळसकर ( राष्ट्रीय समाज,2क्क्4-पनवेल), उषाताई कांबळे (भारीप बहुजन महासंघ-2क्क्9-उरण)
 
राजकारणात महिला पुढे येत आहेत. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी याची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे महिलांना एक संधी दिली पाहिजे होती. परंतु पक्षहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.
- वासंती उमरोटकर, काँग्रेस, महिला जिल्हाध्यक्ष