शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचे आठवलेंना सहकार्यासाठी साकडे

By admin | Updated: October 30, 2016 02:29 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी लोकशाही वाचवा अभियान सुरू केले आहे. शिवसेना

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी लोकशाही वाचवा अभियान सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शनिवारी भेट घेतली. अविश्वास ठराव व नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. महापौर सुधाकर सोनावणे व सभागृह नेते जयवंत सुतार यांनी संविधान बंगल्यावर जावून आठवले यांच्याशी चर्चा केली. आयुक्त मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामांची माहीती देण्यात आली. मुंढेंनी पहिल्या दिवसापासून महापौर व इतर लोकप्रतिनिधींची संवाद ठेवला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये दरी निर्माण झाली व त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होवू लागला. महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी न करता आंबेडकर भवनच्या डोमला मार्बल लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. अविश्वास ठराव का आणावा लागला याची माहिती देण्यात आली. महापौर व सभागृह नेते यांनी सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर आठवले यांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आवश्यकता भासल्यास यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)