शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानचा शिलकी अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:41 IST

माथेरान हे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनपूरक विकासासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला माथेरान नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत

कर्जत : माथेरान हे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनपूरक विकासासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला माथेरान नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. हा अर्थ संकल्प शिलकी आहे. माथेरानचे नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. माथेरान नगर परिषदेने सादर केलेल्या ४१ कोटी रु पयांच्या अर्थसंकल्पात ४ कोटी २५ लाख रु पये प्रवासी कर हॉटेल टॅक्स तसेच घरपट्टीमधून जमा होणार आहेत. तर साहाय्यक अनुदान, प्रादेशिक पर्यटन अनुदान, जिल्हा नियोजनातून मिळणारे अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण उपक्र मासाठी मिळणारे अनुदान अशा विविध अनुदानांतून उर्वरित रक्कम जमा होणार आहे. या मधून नागरी सुविधांबरोबर पर्यटन आणि पर्यावरणपूरक कामे करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात ठेवली आहे.माथेरानमधील मुख्य रस्ता एमएमआरडीए करणार असले तरी प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची आगामी पावसात पारंपरिक पद्धतीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांत घोड्यावरून पडून पर्यटक जखमी होण्याचे आणि मृत्युमुखी पडण्याचे दुर्दैवी प्रकार घडल्याने यासाठी माथेरान नगर परिषदेच्या वतीने हेल्मेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ५ लाख रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी ओपन जीमची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. व्यायामशाळेसाठी अद्ययावत उपकरणे देण्यासाठी १० लाख रु पयांची तरतूद आहे. पर्यटक व नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी माथेरानमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरान नगर परिषदेन डिझेल शवदाहिनी उभारली असून, त्यामधील अंत्यसंस्कार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी उपक्र मांसाठी माथेरान नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी नगर परिषद यापुढे अर्थ साहाय्य करणार आहे. यावेळी उप नगराध्यक्षा सुनीता पेमारे, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र बावीस्कर माजी नगरध्यक्ष अजय सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पर्यटकांना मूलभूत सोयीसुविधांची हमीअल्पसंख्याक समाजासाठी विकासकामे करता यावी, यासाठी २० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. माथेरान नगर परिषदेने गेल्यावर्षी काही विकासकामे हाती घेतली आहेत, त्याची पूर्तता करण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पेमस्टर गार्डन आणि एन लॉर्ड गार्डन या दोन उद्यानांत दररोज सायंकाळी संगीत ऐकण्याची सुविधा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.