शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

By admin | Updated: March 8, 2017 04:50 IST

राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी क्लासच्या शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण गंभीर असून, त्याची

नवी मुंबई : राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी क्लासच्या शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण गंभीर असून, त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी रिपाइंच्या (आठवले गट) नवी मुंबई युवक आघाडीने केली आहे. युवक आघाडीच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांची भेट घेवून ही मागणी केली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. २८ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परंतु आतापर्यंत परीक्षेपूर्वीच तीन पेपर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वाशी पोलिसांनी खासगी क्लासच्या एका शिक्षकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे, तर मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पेपरफुटीचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइं युवक आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांची भेट घेवून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रिपाइं युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विजय मोरे, नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष विजय कांबळे, ठाणे लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यशपाल ओहोळ, तसेच प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे, युवक सरचिटणीस सचिन कटारे, एल.आर. गायकवाड, बाळू गायकवाड, विनोद वानखेडे, नसीम शहा, गुड्डू शेख आदींचा समावेश होता.