शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

अग्निशमनविषयी उदासीनता कायम

By admin | Updated: March 27, 2016 02:40 IST

पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पनवेल नगरपालिकेने १८८४मध्येच अग्निशमन यंत्रणा सुरू केली. कर्जतपर्यंतच्या आगी विझवण्याचे काम या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. पण सध्या तळोजा एमआयडीसी, सिडको नोडसह पालिका क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कारखान्यांतील कामगारांसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील डांबर प्लांटमध्ये नुकतीच आग लागली. यात चार कामगारांचा मृत्यू झाला. या कंपनीत आग विझवणारी यंत्रणा बंद असल्याचे नंतर निदर्शनास आले आहे. परंतु एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याची ही एकच कंपनी आहे. अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांमध्येही ती यंत्रणा बंद आहे. ८६३ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत आहे. ९७० कारखाने व इतर उद्योग सुरू असून, ७६ हजार नागरिकांना प्रत्यक्ष व ५० हजार नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल येथेन होते. परंतु एवढ्या मोठ्या वसाहतीच्या सुरक्षेसाठी अग्निशमन केंद्रामध्ये फक्त दोन फायर इंजिन सुरू आहेत. उर्वरित सर्व बंद झाली आहेत. परिसराची व्याप्ती पाहून ३४ कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये फक्त १७ कर्मचारीच आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना २४ तास केंद्रामध्येच राहावे लागते. १२ तासांची ड्युटी संपली तरी केंद्राच्या बाहेर जाता येत नाही. अनेकवेळा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अग्निशमन केंद्र म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी कोंडवाडा झाला आहे. एमआयडीसीप्रमाणेच नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची स्थिती आहे. झोपडीमध्ये एक टेबल व तीन खुर्च्या टाकून मुख्य कार्यालय सुरू केले आहे. १३० वर्षांपूर्वी स्वत:च सक्षमपणे आग विझविणारी यंत्रणा असणाऱ्या नगरपालिकेकडे आता फक्त एकच वाहन आहे. दुसरे फायर इंजिन बंदच आहे. सफाई कामगारांवर आग विझवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वास्तविक शहरात आग लागली तर विझविण्याची क्षमताच पालिकेच्या केंद्रामध्ये नाही. यामुळे साप पकडणे, पक्षी व प्राणी अडकले असतील तर त्यांची सुटका करणे ही कामे करावी लागत आहेत. सिडकोने खारघर, कळंबोली व नवीन पनवेलमध्ये अग्निशमन केंदे्र सुरू केली आहेत. मनुष्यबळही भरपूर आहे; परंतु सहा माळ्यांपेक्षा उंच इमारतीत आग लागल्यास ती विझवण्यासाठी यंत्रणाच नाही. सिडको क्षेत्रामध्ये २० ते २४ मजली इमारती बांधण्यास परवानगी दिली जाते. परंतु अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही. यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह सिडको नोड व पालिका क्षेत्रातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणाऱ्य पनवेलमध्येही उंच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. मात्र तेथे बसविण्यात येणाऱ्या अग्निरोधक यंत्रणांचे आॅडिट होत नसल्याचे उघड झाले आहे. अजून किती बळी हवेतकळंबोलीमध्ये वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला होता. पनवेलमध्ये स्कूलबसला आग लागल्याने जवळपास २५ विद्यार्थी जखमी झाले होते. यामधील अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गत आठवड्यात तळोजामधील डांबर कंपनीत आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असून अजून किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. शहरात सर्वत्र फायर हैड्रटनगरपालिकेने शहरात ३० ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. शिवाजी रोडवर ६, पोस्टाजवळ, धूतपापेश्वर कारखाना, कोळीवाडा, मार्केट, पांजरापोळ, उलवारोड, मिरची गल्ली, जोशी गल्ली व पालिकेच्या कार्यालयाजवळ प्रत्येकी १, महात्मा गांधी रोडवर ८, पाटील मोहल्लामध्ये २, टिळक रोडवर ५ ठिकाणी फायर हैड्रट बसविले होते. १३० वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एवढी तत्परता दाखविली होती. सद्य:स्थितीमध्ये मात्र प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशी होती पालिकेची यंत्रणा पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे, त्याचबरोबर सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारणारीही पहिली पालिका आहे. १८८४ मध्ये प्रथम आग विझविणारा बंब खरेदी करण्यात आला. या बंबाच्या साहाय्याने शहरातील मेघजी मनजी यांच्या घराला लागलेली आग व तक्का, पुराणिक बंगला, परस्पा मिल येथे लागलेल्या आगी विझविल्या होत्या. १९४६ मध्ये मिलट्रीमधील फायर इंजिन १,५०० रुपयांना विकत घेतले. कर्जतमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये सायंकाळी आग लागली. ठाणे, कल्याण, लोणावळा, ठाणे, मुंबईमध्ये तार पाठवून फायर इंजिन मागविले. परंतु सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले ते पनवेल पालिकेचे फायर इंजिन त्यावेळच्या डीएसपींनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले होते.