वावोशी : ग्रील बसविण्याचे काम घेतले या कारणावरून भगवान बर्गे (३२. रा. तळाशी, बर्गेवाडी, शिरवली) याचा खून त्याचा मित्र रमेश बर्गे यांनी केल्याची घटना बर्गेवाडीच्या जंगलात घडली. भगवान बर्गे यांना प्राथमिक शाळेतील लोखंडी ग्रील बसविण्याचे काम मिळाले होते. भगवानला काम मिळाल्याचा राग रमेश बर्गे याच्या मनात होता. बुधवारी दुपारी ३ वाजता रमेश बर्गे भगवानला घेऊन बर्गेवाडी जवळील जंगलात गेला होता. त्या ठिकाणी रमेशने भगवानला मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या भगवानचा मृत्यू झाल्यानंतर रमेश फरार झाला. भगवानला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र, भगवानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. भगवानचा रमेशच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार भगवानची पत्नी संगीता हिने खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)
बर्गेवाडीच्या जंगलात मित्रानेच के लाखून
By admin | Updated: March 31, 2017 06:28 IST