शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पातील पात्र-अपात्र अर्जदारांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:09 IST

सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांची योजना जाहीर करण्यात आली.

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम पूर्ण केल्यानंतर आता अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या अर्जदारांना घरांचे अ‍ॅलोटमेंट अर्थात ताबापत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना राहून गेलेले त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांची योजना जाहीर करण्यात आली. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २ आॅक्टोबर २०१८ रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली, यात यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अ‍ॅक्सिस बँकेच्या संबंधित शाखांत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्च २०१९ मध्ये निवारा हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ई-मेल, फोन तसेच एसएमएसद्वारे वेळ देण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्जदारांना ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

या कालावधीत यशस्वी ठरलेल्या सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पडताळणी पूर्ण झालेल्या अर्जांची पात्र आणि अपात्र अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. सोडतीत यशस्वी ठरलेल्या ज्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असले तरी अपात्र ठरलेल्या या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसाच्या आत संबधित विभागाकडे अपिल करता येणार आहे. अपिल करण्यासाठी १३ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अपिलात जाणाऱ्या अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन अपॉईमेंट घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रे पुर्नपडताळणीसाठी सादर करणे गरजेचे आहे. सिडकोचे व्यवस्थापक (पणन-२) अपिलावरील अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान, विविध तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अर्जदारांना आपली पात्रता सिध्द करण्यासाठी ही अखेरची संधी असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई