शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या नगरपालिकेचा बहुमान मिळू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:56 IST

पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु आतापर्यंत अधिकृतरीत्या हा बहुमान शहरास मिळाला नाही. पालिकेने यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा

नवी मुंबई : पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु आतापर्यंत अधिकृतरीत्या हा बहुमान शहरास मिळाला नाही. पालिकेने यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरची ओळख आहे. परंतु वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच पहिली पालिका असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. यासाठी ज्या नगरपालिका प्रथम क्रमांकाचा दावा करतात, त्यांच्या स्थापनेची तारीखही दिली होती. या वृत्तामुळे पनवेलमधील नागरिकांनीही पालिकेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष शिवदास कांबळे यांनीही नगराध्यक्षा चारुशीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना पत्र दिले आहे. पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका असेल तर तो बहुमान शहरास मिळाला पाहिजे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शहराची महापालिका होण्यापूर्वी राज्यातील पहिली पालिका असल्याचा अधिकृत बहुमान शासनाकडून मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. नगरपालिकेचा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवला पाहिजे. आतापर्यंत केलेले चांगले काम, उपक्रम ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जतन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता नगराध्यक्षा व मुख्याधिकारी याविषयी काय भूमिका घेणार व कधी पाठपुरावा करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)