शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शांती यात्रेकडे शहरवासीयांची पाठ

By admin | Updated: October 24, 2016 02:54 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशनसमोर शांती यात्रेचे आयोजन केले होते

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशनसमोर शांती यात्रेचे आयोजन केले होते. सायंकाळी शिवाजी चौकातही वॉक फॉर मुंढे मोहीम राबविण्यात आली. पण दोन्ही ठिकाणी नागरिकांची अत्यंत तुरळक उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले. पालिका आयुक्तांच्या विरोधात २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. मुंढे हे प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे व नवी मुंबईमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे सुरवातीला त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. सोशल मीडियामधून वुई वाँट मुंढेची मोहीम राबविण्यात आली होती. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवरही मुंढे यांच्या समर्थनामध्ये सोशल मीडियामधून अभियान राबविले जात आहे. याचाच भाग म्हणून रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौकापर्यंत वॉक फॉर मुंंढे या शांती यात्रेचे आयोजन केले होते. पण यासाठी जेमतेम २० ते २५ नागरिकच उपस्थित राहिले. उपस्थितांनी स्टेशनसमोर आयुक्त मुंढे आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे फलक दाखविले. पण परवानगी नसल्याने व नागरिकही कमी असल्याने रॅली काढण्यात आली नाही. सायंकाळी पुन्हा शिवाजी चौकामध्ये जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. मुंढे यांच्या समर्थनात हजारो नवी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले होते. पण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नागरिक उपस्थित राहिले. मुंढे समर्थन रॅलीकडे शहरवासीयांनी पाठ फिरविल्यामुळे दिवसभरामध्ये सोशल मीडियातील मोहीमही शांत झाली होती. उपस्थित नागरिकांनी मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. पालिकेमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहराच्या हितासाठी मुंढे हवे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)