शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आघाडीचे जागावाटप जाहीर

By admin | Updated: May 4, 2017 06:20 IST

महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. शेतकरी

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. शेतकरी कामगार पक्ष सर्वाधिक ४८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँगे्रस १८ व राष्ट्रवादी १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावरून युतीमध्ये एकमत झाले नाही. यामुळे शिवसेना व भाजपाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर, ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षानेही आरपीआयला सोबत घेऊन सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी व काँगे्रसने पंचायत समिती, जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिका निवडणुकीमध्येही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी कामगार पक्षाची महापालिका क्षेत्रामध्ये संघटनात्मक बांधणी चांगली असल्याने त्यांना सर्वाधिक ४८ जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी व काँगे्रस लढणार आहे. आघाडीविषयी माहिती देताना शेकापनेते विवेक पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या आहेत. या निवडणुकीमध्ये उरणसह पनवेलमध्ये भाजपाच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली गेली आहे. महापालिका निवडणुकीमध्येही पूर्ण ताकदीने आघाडी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडीच्या वतीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. काँगे्रसचे सर्व माजी मुख्यमंत्री व महत्त्वाच्या नेत्यांना प्रचारासाठी बोलावण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही प्रचारासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती विवेक पाटील यांनी दिली आहे. विकासाच्या मद्द्यांबरोबर भारतीय जनता पक्षाच्या येथील आमदारांच्या अपयशाबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न सोडविण्यात आलेल्या अपयशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)