शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रानसईमधील आदिवासींना बनविले भूमिहीन

By admin | Updated: October 5, 2016 03:07 IST

रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे. सहाही पाड्यांसाठी अद्याप गावठाण मंजूर झालेले नसून त्यांचे वास्तव्य असलेल्या गावची जमीनही खाजगी व्यक्तीच्या नावावर आहे. शासनाने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये रानसई गावामध्ये १२७६ लोकसंख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधील १२६७ रहिवासी आदिवासी व उरलेले अनुसूचित जातीमधील आहेत. ९९.२९ टक्के आदिवासी नागरिक असूनही येथील जमिनीवर मात्र त्यांचा अधिकार नाही. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे धरणासाठी जमीन संपादित केल्यानंतर १० ते १२ जणांनाच जमिनीचा अत्यंत तुटपुंजा मोबदला मिळाला. उर्वरित आदिवासींना मोबदला मिळाला नाही. सद्यस्थितीमध्ये गावच्या परिसरात जवळपास १६३१ हेक्टर जमीन शिल्लक आहे. बहुतांश जमीन एमआयडीसी, वनविभागाच्या व सावकाराच्या नावावर आहे. ज्याचा गावाशी काहीही संबंध नाही त्यांच्या नावावर एक हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन कशी असा प्रश्न आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत. सहा पाड्यांमध्ये रानसई गाव वसले आहे. परंतु गावातील घरे असलेली जमीनही आदिवासींच्या नावावर नाही. गावाला गावठाणच नसल्याने गावठाण विस्तार योजनाही राबविता येत नाही. कोणत्याही सुविधा देता येत नाहीत. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी आमचे वास्तव्य आहे. या जमिनीवर भाजीपाला पिकवून आम्ही उदरनिर्वाह करत आहोत. परंतु त्या जमिनी मात्र आमच्या नावावर नाहीत. या जमिनीवर आदिवासींचाच हक्क असून त्याचे वाटप आम्हाला करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. परंतु या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. महसूल विभागाच्या संकेतस्थळावरून रानसई गावाविषयी माहिती घेतली असता एक टक्का जमीनही आदिवासींच्या नावावर नसल्याचे समोर आले आहे. देशातील सर्वात स्वस्त भूसंपादनउरण व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने रानसई धरण बांधले. धरण बांधण्यासाठी शासनाने अत्यंत अल्प मोबदला देवून जमीन संपादित केली. मुळात सातबारा उताऱ्यावर आदिवासींची नावेच नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या रहिवाशांनाच मोबदला मिळाला. मिळालेला मोबदला अत्यंत तुटपुंजा होता. संपादनाचा इतिहास पाहिल्यास देशातील सर्वात कमी मोबदल्यात संपादन झालेली जमीन रानसईचीच असेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. आमची जमीन आम्हाला द्या आमच्या गावात सर्व आदिवासी नागरिक रहात आहेत. कित्येक पिढ्या आम्ही याच जमिनीवर वास्तव्य करत आहोत. आदिवासींना जंगलाचे राजे म्हटले जाते. पण आम्हाला मात्र शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेने भिकारी बनविले आहे. आमची घरेही आमच्या नावावर नाहीत. शेती करत असलेली जमीनही दुसऱ्यांच्याच नावावर आहे. आमच्या जमिनीचा हक्क आम्हाला मिळवून देण्यासाठी कोण लढा देणार असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.