शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शाळेत शिक्षकाची उणीव

By admin | Updated: March 1, 2016 02:42 IST

येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत पाच शिक्षक मंजूर असतानाही मुख्याध्यापकांसह एकूण चारच शिक्षक शिक्षणाचा कारभार चालवीत असल्याने उर्वरित जागा तातडीने भरावी

नागोठणे : येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत पाच शिक्षक मंजूर असतानाही मुख्याध्यापकांसह एकूण चारच शिक्षक शिक्षणाचा कारभार चालवीत असल्याने उर्वरित जागा तातडीने भरावी, अशी पालकवर्गाची मागणी आहे. याबाबत रोहे पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण महाले यांच्याकडे विचारणा केली असता, तालुक्यात खैरे खुर्द शाळेत शिक्षक कमी असल्याने नागोठणे शाळेचा एक शिक्षक तात्पुरता खैरे शाळेत पाठविण्यात आला आहे. या शिक्षकाचा पगार आजही नागोठणे शाळेतूनच निघत असल्याने त्यांना एक - दीड महिन्यात पुन्हा नागोठणे शाळेतच आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येथील राजिपच्या उर्दू शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग असून, सध्या ११६ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या शाळेत पाच शिक्षक मंजूर आहेत व पूर्वी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक येथे कार्यरत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी येथील एक शिक्षक तालुक्यातील खैरे खुर्द शाळेत पाठविण्यात आल्याने सध्या येथे मुख्याध्यापक महिलेसह इतर तीन शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामकाजासह विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सुद्धा भूमिका पार पाडावी लागत असल्याचे शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य मन्सूर इब्राहीम मुजावर यांचे म्हणणे आहे. शाळेवर व्यवस्थापन समितीचे कायम लक्ष असते. शाळेतील सर्वच विद्यार्थी शिस्तप्रिय असून, शिक्षकवर्ग शिक्षण देण्याचे काम सुद्धा इमानेइतबारे करीत असतात. मात्र पूर्वी येथे पाच शिक्षक असताना यातील एक शिक्षकाची बदली झाल्याने मुख्याध्यापिकावरही शिकविण्याची वेळ आली असल्याचे मुजावर यांचे म्हणणे आहे. येथील शाळेत संगणकसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)