शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांत सुविधांचा अभाव

By admin | Updated: March 21, 2016 02:01 IST

पनवेल-सायन महामार्ग, जवळच असलेल्या खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकांमुळे कामोठे वसाहतीला महत्त्व प्राप्त झाले. नोडमध्ये मोठमोठ्या इमारती उभा राहिल्या असल्या

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपनवेल-सायन महामार्ग, जवळच असलेल्या खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकांमुळे कामोठे वसाहतीला महत्त्व प्राप्त झाले. नोडमध्ये मोठमोठ्या इमारती उभा राहिल्या असल्या तरी खांदेश्वर व मानसरोवर ही स्थानके मात्र असुविधांच्या फेऱ्यातून अद्याप बाहेर पडलेली नाहीत. दोन्ही स्थानकांत पुरेशा सोयीसुविधा नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. यासाठी सिडको तसेच रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. २० वर्षांपूर्वी पनवेल परिसरात उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. २००८ साली मानसरोवर स्थानक विकसित करण्यात आले. नागरिकांना खांदेश्वर, मानसरोवर ही स्थानके दळणवळणासाठी सोयीची पडू लागल्याने या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. दोन्ही उपनगरीय रेल्वे स्थानके कामोठे वसाहतीच्या हद्दीत आहेत. बाजूलाच सिडकोने कामोठे नोड विकसित केला आहे. दोन्ही रेल्वे स्थानकांतून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करीत असले तरी त्यांना पुरेशा सुविधा नाहीत. स्थानकातील पंखे तुटलेले आहेत. इंडिकेटर्स बहुतांश वेळा बंदच असतात. या ठिकाणी स्वच्छतेचाही बोजवारा उडला आहे. अनेकदा स्थानकातील, सबवेमधील वीजपुरवठा खंडित असतो. पायऱ्यांवरील रेलिंगही तुटलेले आहेत. त्यामुळे प्रवासी अडखळतात. सध्या उन्हामुळे काहिली होत असली तरी खांदेश्वर रेल्वे स्थानकातील सर्व पाणपोई बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयात पाणी येत नाही. मानसरोवर रेल्वे स्थानकातील फलाटावर लावण्यात आलेल्या पाणपोई पाण्याअभावी धूळखात पडल्या आहेत. दोन्ही रेल्वे स्थानक परिसरातील विजेचे दिवे ५० टक्के बंद असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानके अद्याप सिडकोकडे असल्याने पायाभूत सुविधा पुरविणे सिडकोची जबाबदारी आहे. याबाबत आम्ही सिडकोकडे सातत्याने पत्रव्यवहार करतो, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला प्रवाशांच्या तक्र ारीला तोंड द्यावे लागते.- भूप सिंग, रेल्वे अधिकारी