शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

कष्टकऱ्यांंचे बँक खातेही नाही

By admin | Updated: May 2, 2016 02:21 IST

मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बँक खातेही नसल्याने बचतीचाही प्रश्न येत नसून, महानगरांमध्ये राहूनही सर्वांचे भवितव्य अंधारमय बनले आहे.मुंबई, ठाणे व नवी मुंबई हा परिसर देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जात आहे. परंतु याच महानगरांमध्ये लाखो कामगारांचे अद्याप बँकेमध्ये खातेही नाही. नाका कामगार, दगडखाण मजूर, बांधकाम क्षेत्र व इतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार दिवसभर कष्ट करुन मिळतील त्या पैशामध्ये संसाराचा गाडा चालवत आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येच बहुतांश रोजंदारी कामगारांचे वास्तव्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरांमधील गगनचुंबी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राबणाऱ्या कामगारांना बिल्डरने बांधून दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. दगडखाणींमध्येही तात्पुरत्या स्वरुपात काम करणारे कामगार त्याच धुळीत कुटुंबासहित वास्तव्य करतात. बँकेमध्ये खाते असेल व त्याचा नियमित वापर केल्यास आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. बचतीची सवय असते परंतु हजारो कामगारांमध्ये याविषयी जागृती करण्यात शासकीय यंत्रणा व सामाजिक कार्यक्रर्त्यांनाही अपयश आले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये चार वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले असताना २६ लाख ६५ हजार ४८१ कुटुंबीयांपैकी २३ लाख ५ हजार १३० नागरिकांचे बँकेत खाते असल्याचे निदर्शनास आले. १७ टक्के नागरिकांचे बँकेत खाते नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये २५ टक्के व रायगड जिल्ह्यामध्ये ३५ टक्के नागरिकांकडे बँक खाते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये काही सामाजिक संस्थांनी नाका कामगार, बांधकाम मजूर व दगडखाण कामगारांना बचतीचे महत्त्व समजावून बँकेत खाते उघडून दिले होते.केंद्र शासनाने जनधन योजना व इतर योजनांसाठी बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले आहे. यामुळे अनेकांनी बँकेत पहिल्यांदाच खाते उघडले आहे. परंतु बचत करण्याचा हेतू नसून शासनाकडून सवलती मिळाव्या एवढाच हेतू आहे. कामगारांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करण्याची सवय लावणेही महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक संस्थांचे उल्लेखनीय कार्यनवी मुंबई, मुंबई परिसरातील झोपडपट्टी विभागात अन्नपूर्णा महिला मंडळाने मायक्रो फायनान्स संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्याच धर्तीवर इतरही सामाजिक संस्था काम करीत आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातूनही अनेक महिला कामगार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये २६,६५,४८१ कुटुंबियांपैकी २३,०५,१३० नागरिकांचे बँकेत खाते आहे. गावाकडे दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नाही व हाताला कामही मिळेना. यामुळे नवी मुंबईत आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत असून रोज मिळणाऱ्या पगारातून दोन वेळचे जेवण करत आहे. पैसेच नाहीत तर बँकेत खाते कसे उघडणार? - संपत चव्हाण,नाका कामगारबांधकाम मजूर म्हणून पतीसोबत काम करते. रोजच हाताला काम मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे जगण्यासाठी धडपड करावी लागते. झोपडपट्टीमध्ये भाड्याने घर घेतले आहे. बँकेत खाते काढायला पैसेही नाहीत व लागणारे पुरावेही.- सावित्री शिंदे, बांधकाम मजूर तुर्भे नाका.