शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेच्या निर्मितीची कुऱ्हाड

By admin | Updated: October 5, 2016 03:11 IST

पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील दोन सदस्य आणि पाच पंचायत समितींच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागपनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील दोन सदस्य आणि पाच पंचायत समितींच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. शेकापच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती प्रिया मुकादम यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने या विभागासाठी सत्ताधाऱ्यांना आता नवीन सभापती द्यावा लागणार आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीचा फटका जिल्हा परिषदेचे दुसरे सदस्य रामचंद्र कारावकर यांनाही बसला आहे. तळोजा निर्वाचन गणातील हरेश केणी, प्रमिला पाटील (आंबे), ज्ञानेश्वर पाटील (नावडे), ज्योत्स्ना पडहिरे (कळंबोली), गोपाळ भगत (कळंबोली) यांचेही पंचायत समिती सदस्यत्व रद्द झाले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अद्यापही सुमारे सहा महिने बाकी होता. परंतु पनवेल महानगर पालिकेमध्ये या सदस्यांचे मतदार संघ समाविष्ट झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सदस्यत्व रद्द झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेकापला बसला. प्रिया मुकादम यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद होते. त्यामुळे सरकारने त्यांना दिलेल्या सर्व सुविधाही रद्द झाल्या आहेत. मुकादम या सरकारी घर आणि वाहन वापरतच नव्हत्या. मात्र त्यांना त्यांचे जिल्हा परिषदेतील कार्यालय खाली करावे लागणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (प्रशासन) प्रकाश खोपकर यांनी सांगितले.