शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कोपरखैरणेत पडीक रोहाऊसला लागली आग

By admin | Updated: December 31, 2016 04:30 IST

अपूर्ण बांधकामामुळे पडीक असलेल्या रोहाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपरखैरणेत घडली. या घटनेमध्ये रोहाऊसच्या समोर उभी असलेली कार देखील

नवी मुंबई : अपूर्ण बांधकामामुळे पडीक असलेल्या रोहाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपरखैरणेत घडली. या घटनेमध्ये रोहाऊसच्या समोर उभी असलेली कार देखील जळाली आहे, तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोपरखैरणे सेक्टर ७ येथील लायन्स क्लब रुग्णालयाच्या मागील बाजूला हा प्रकार घडला. अनेक वर्षे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे हे रोहाऊस पडीक झाले होते. याठिकाणी एक बेघर महिला दोन मुलींसह रहात होती. परिसरातील अनेकांनी दिला जुने कपडे दिल्याने याठिकाणी कपड्यांचा ढीग साचला होता. शुक्रवारी सकाळी त्याठिकाणी आग लागल्याने या कपड्यांनी पेट घेतला. काही वेळातच आग रोहाऊसच्या संपूर्ण जागेत पसरल्याने समोरच उभ्या असलेल्या कारने देखील पेट घेतला. राहत्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे संबंधिताने ती कार त्याठिकाणी उभी केलेली होती. दरम्यान, कारने पेट घेतल्यानंतर टायर फुटल्याचे स्फोटासारखे आवाज येत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिवाय ही आग लगतच्या इतर रोहाऊसमध्ये देखील पसरण्याची शक्यता निर्माण झालेली. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न झाले. यामुळे ही आग वेळीच आटोक्यात येवून मोठी दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)