शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोळी समाजाची उडाली तारांबळ

By admin | Updated: May 23, 2017 02:09 IST

कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड

आविष्कार देसाई लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन उघड्यावर पडणारे संसार वाचविण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने अतिक्रमणधारकांची धाकधूक मात्र वाढली आहे.‘दोनशे मच्छीमारांवर बेघर होण्याची वेळ’ या मथळ््याखाली लोकमतमध्ये सोमवार, २२ मे रोजी वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे अतिक्रण करणारे मच्छीमार खडबडून जागे झाले. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. अशीच धावपळ त्यांची १९९६-९७ साली झाली होती. कोळी समाजाच्या विविध बैठकांना जोर आला आहे.मच्छीमारांनी ज्या जागेवर अतिक्रमण केले आहे ती जागा कस्टम विभागाची असल्याने ती पुन्हा कस्टमच्या ताब्यात मिळावी यासाठी कस्टम विभागाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत. १५ दिवसांमध्ये जमीन खाली करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यासाठी कस्टम विभागाने १९९६-९७ साली जिल्हा न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा आधार घेतला आहे.कस्टम विभागाकडून होणारी कारवाई तातडीने थांबावी यासाठी कोळी समाज एकवटला आहे. त्यांनी यातून लवकरच मार्ग काढण्यासाठी थेट केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांची सोमवारी पेण तालुक्यातील वडखळ येथील एका कार्यक्रमात भेट घेतली. नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती त्यांनी गीते यांना दिली. गीते यांनी प्रतिनिधींचे बोलणे ऐकून घेत‘मी यात लक्ष घालतो’ असे सांगितल्याचे परशुराम सारंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने कोळी समाजाचे प्रतिनिधी काही अंशी निराश झाले. यातून तातडीने मार्ग निघणे गरजेचे असल्याने कोळी समाजातील लोकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.