शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसी प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: February 21, 2016 02:36 IST

प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत

- शैलेश चव्हाण,  तळोजा प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ खूप गंभीर पावलं टाकत असल्याचे सांगितले जाते, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात प्रदूषणाने थैमान घातले असून, याचा भयंकर त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या विभागातील एकही नेता या गावांच्या समस्या जाणून घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीत सुमारे ८८९ छोटे मोठे कारखाने असून, या परिसरात काही कंपन्या बेसुमार खुलेआम प्रदूषण करीत असल्याचे दिसून येते आहे. यांच्यावर एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नसल्याने याचा त्रास परिसरातील पडघे, देवाचा पाडा, चिंध्रणगाव, नावडे, रोडपाली, पेंधर, टोंडरे, निरलस, सिध्दीकरवले, घोट व परिसरातील इतर खेडे गावांना होत आहे. या औद्योगिक वसाहतींमधून निर्मळ वाहणारी कासाडी नदी दूषित झाली आहे. रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने रासायनिक पाणी नदीच्या पात्रात सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील मासे गायब झाले असून, मासे पकडून उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांचा सध्या दुष्काळ सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बेलापूर रायगड भवन येथे बसतात. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणाची गंभीरता मंडळाच्या लक्षात येत नाही का, असे प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत.तळोजा औद्योगिक वसाहत व तळोजा सीईटीपीसोबत बैठका सुरू असून, प्रदूषणावर ठोस भूमिका घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहोत. दूषित पाणी वाहिन्यांची दुरु स्ती व नवीन जोडणी लवकरच करण्यात येणार आहे.- नागेश लोहळकर, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहेत, मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रात वाढत असलेल्या प्रदूषणाने स्थानिक ग्रामस्थांची झोप उडविली आहे. कासाडी नदीला लागून असणारे कारखानदार बिनधास्त या नदीच्या पात्रात छुप्या पध्दतीत दूषित पाणी सोडत आहेत. त्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारची पाळी आली आहे. लवकरच याविषयी आंदोलन छेडण्यात येईल.- एकनाथ देशेकर, ग्रामस्थ चिंध्रण, जि.प. सदस्य