शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

वाशीतील उद्यानांत घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:06 IST

स्वच्छता अभियानाचा फज्जा; भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. परंतु काही भागांत या अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. विशेषत: वाशी विभागातील स्वच्छतेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.वाशी सेक्टर १७ येथील नवरत्न हॉटेलच्या समोर असेलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. दर्शनीभागात असलेल्या या उद्यानात कचऱ्याचे ढीग आहेत. गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी आपला अड्डा बनविला आहे. जवळच कचराकुंडी असतानाही परिसरातील व्यावसायिक या उद्यानात कचरा टाकतात. त्यामुळे या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक दिवस कचरा न उचलला गेल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने हे क्षेत्र नवी मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागात विविध शासकीय प्राधिकरणांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता असतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांची नेहमीच येथे ये-जा असते. तरीही उद्यानाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सेक्टर १७ प्रमाणेच सेक्टर २ मधील मेघदूत, मेघराज आणि अ‍ॅबट हॉटलच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित सफाई होत नसल्याने ठिकठिकणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. सफाई कामगार येथील दुकानदारांकडून पैसे घेऊन सफाईची कामे करीत आहेत. या कम्पाउंडमध्ये समाजकंटकांचा वावर वाढला आहे. अनेक महिन्यांपासून येथील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी भिकारी व गर्दुल्ल्यांसाठी हा परिसर आश्रयस्थान बनला आहे.माय नेस्ट शॉप ओनर्स असोसिएशनने यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे. तसेच या विभागाचे माजी नगरसेवक अविनाश लाड यांनाही पत्र दिले. पथदिवे बसविण्याबरोबरच नियमितपणे साफसफाईची कामे करण्याची विनंती केली आहे. परंतु सदर प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.या परिसरात अनेक नागरी समस्या आहेत. समाजकंटकांचा वावर वाढला आहे. या टोळक्यांकडून परिसरात अस्वच्छता पसरविली जाते. तसेच पथदिवे बंद असल्याने त्याचा फायदा भिकारी व गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.    - सामुल चेरियनमाय नेस्ट शॉप ओनर्स असोसिएशन