शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

खोपोली नगरपरिषद प्रथम

By admin | Updated: May 5, 2017 06:08 IST

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने मागवलेल्या अहवालानुसार शासनाच्या विविध योजना राबविताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या

वावोशी : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने मागवलेल्या अहवालानुसार शासनाच्या विविध योजना राबविताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांना रोख रक्कम घोषित करण्यात आली. यात कोकण विभागातून खोपोली पालिकेने ‘ब’ वर्ग श्रेणीतून पहिला क्र मांक पटकावून तीन कोटींचे पारितोषिक नगरविकास खात्याने घोषित केले. गुरु वारी एका समारंभात हा पुरस्कार खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालय (वरळी मुंबई) कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायती यांचा सन्मान करण्याबाबत अध्यादेश काढला होता. याकरिता राज्यभरात जिल्हास्तरीय निवड समितीही गठीत करण्यात आली होती. समितीने १० एप्रिल रोजी आपला अहवाल नगरविकास खात्याकडे सुपूर्द केला. यात कोकण विभागातून पाच नगरपरिषदांना पुरस्कार घोषित झाले. यात खोपोलीचा पहिला क्र मांक घोषित झाला. या पुरस्कारासोबत तीन कोटी रु पयांची रक्कम नगरपरिषदेस मिळणार आहे. नगरपरिषदांमध्ये ‘अ’ वर्ग नगरपरिषदांना चार कोटी, ‘ब’ नगरपरिषदांना तीन कोटी व ‘क’ नगरपरिषदांना दोन कोटी असा निकष राज्य शासनाने लावला आहे.राज्य व केंद्र शासनाने राबविलेल्या विविध योजना यात स्वच्छ महाराष्ट्र मिशन, शहरातील जनगणनेनुसार लोकसंख्या आधारित मालमत्ता कर माहिती, आरोग्यविषयक माहिती यात, घंटागाडीची संख्या, बायोगॅस प्रकल्प, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकास योजना, पाणीपुरवठा योजना, नागरी दुर्बल घटकांसाठी राबविलेल्या योजना, वृक्ष गणना व लागवड आदी संबंधीची माहिती राज्य शासनाने मागविली होती. या माहितीच्या आधारे निवड समितीने अभ्यास करून खोपोली पालिकेला ब वर्ग नगरपालिकेत प्रथम क्र मांकाचे पारितोषिक घोषित केले. खोपोली मुख्याधिकारी डॉ.दीपक सावंत यांना पारितोषिक घोषित झाल्याचा दूरध्वनी बुधवारी दुपारी मंत्रालयातून आला होता. या पारितोषिकाचे वितरण गुरु वारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, पालिकेला मानाचा पुरस्कार व तीन कोटींचे पारितोषिक मिळाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल व मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सर्व नगरसेवक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. (वार्ताहर) खोपोली नगरपरिषदेला हा पुरस्कार २०१६-१७ मधील कामगिरीच्या अहवालावरून प्राप्त झाला आहे. या दरम्यान तत्कालीन नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष रमेश जाधव, सर्व समिती सभापती, नगरसेवक यांनी मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांच्याबरोबर अतिशय नियोजनबद्धरीत्या काम केले व विविध योजनांची खोपोलीत अंमलबजावणी केली म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. यापुढेही नगरपरिषद अशा प्रकारे उत्कृष्ट कामकाज करणार असून, येथील नागरिकांना उत्तम सेवा देऊन शहराचा विकास करणार.- सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली नगरपालिका