शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

खारघर टोलनाक्यावर चक्काजाम

By admin | Updated: November 10, 2016 03:47 IST

मंगळवार मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.

पनवेल : मंगळवार मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. या निर्णयाचा परिणाम सर्वांवरच झाला असून सायन - पनवेल महामार्गावर टोल वसुलीसाठी उभारलेल्या टोल प्लाझावर सुट्या पैशांच्या अभावामुळे दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गुरु वारी सकाळी ७ च्या सुमारास ही वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर केवळ अवजड वाहनांकडून टोल वसुली केली जाते, मात्र वाहतूक कोंडीमुळे लहान वाहनांना याचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन देखील टोल प्रशासन वाहने सोडत नसल्याने खारघर पोलीस व वाहतूक पोलिसांना याठिकाणी धाव घ्यावी लागली. ५००, १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्यामुळे सर्वच जण आपल्याकडील या नोटा संपविण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच सर्वच ठिकाणच्या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. सकाळी घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतुकीचा देखील मोठा अडथळा निर्माण झाला. शाळेच्या बस, मालवाहू गाड्या, अवजड वाहने यांना हा अडथळा निर्माण झाला. खारघर, कामोठे टोल प्लाझावर सुमारे १ ते २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून देखील टोल प्रशासनाने वाहने सोडण्यास नकार दिला. यावेळी वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालकांनी आपल्या गाड्या विरु द्ध दिशेने चालविल्या. यामध्ये शाळेच्या बसेसचा देखील समावेश होता. त्यामुळे महामार्गावर भीषण आपघाताची शक्यता वर्तविण्यात येत होती. ठरावीक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाल्यास टोल वसूल न करता वाहने मोफत सोडण्याचे नियम असून देखील वाहने सोडली जात नव्हती. वाहतूक कोंडीचे छायाचित्र घेणाऱ्या छायाचित्रकाराला देखील टोल प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून अटकाव करण्यात येत होता. मात्र सायंकाळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिल्यानंतर सर्वच वाहनांना टोल न घेता सोडण्यात आले. (प्रतिनिधी)