शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र महापालिकेसाठी खारघर बंद

By admin | Updated: September 8, 2016 03:02 IST

पनवेल महानगरपालिकेत खारघरचा समावेश नको याकरिता खारघरमधील काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत खारघरचा समावेश नको याकरिता खारघरमधील काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गुरु वारी ९ सप्टेंबरला या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. खारघर शहरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी व खारघर शहराला पनवेल महानगरपालिकेमधून वगळावे या मागणीसाठी खारघरमध्ये बुधवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. खारघर एक्शन टेकन कमिटीच्या वतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी शहरातील सेक्टर २०, १९, ४, ३०, ३४ , ३५ याठिकाणच्या परिसरात बंद पाळण्यात आला. मात्र शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले सेक्टर ४, ७ याठिकाणी बंदचा काहीच परिणाम दिसून आला नाही. या बंदला शेकाप, मनसे, काँग्रेसने पाठिंबा दिला होता. भाजपा, शिवसेना या बंदमध्ये सहभागी झालेली नव्हती. खारघर शहरात पनवेल महानगरपालिकेवरून राजकारण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मनसे, शेकापला खारघर शहराची स्वतंत्र महानगरपालिका हवी आहे. तर शिवसेनेची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. खारघरला पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोध नाही तर पनवेल महानगरपालिकेला खारघर-पनवेल महानगरपालिका नाव द्यावे, अशी मागणी असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुनाथ पाटील म्हणाले. खारघर एक्शन टेकन कमिटीच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेवर गुरु वारी सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) अर्धवट विकासाच्या आधारे खारघर शहराला महानगरपालिकेत समाविष्ट करणे भविष्यात विविध प्रश्न उद्भवतील. खारघरच्या विकासाला हा मुद्दा बाधा ठरू नये म्हणून जनहित याचिका दाखल करून त्यामध्ये आमचे म्हणणे मांडले आहे. आजच्या बंदला शेकापचा पाठिंबा आहे. - संजय घरत, चिटणीस, शेकाप खारघर

भविष्यातील मोठे महानगर म्हणून खारघर शहर उदयास येणार आहे. सिडकोने देखील पनवेल महानगरपालिकेत खारघर शहराचा समावेश करू नये अशी भूमिका मांडली होती. याच मुद्याला अनुसरून आम्ही ही जनहित याचिका दाखल केली आहे. - केसरीनाथ पाटील, मनसे जिल्हा चिटणीस