शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘काही तरी कर पनवेलकर’ मोहिमेचे सिडकोत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 02:37 IST

पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’

नवी मुंबई : पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’ या सदराखाली परिसरातील सोयी-सुविधांचा लेखाजोखा मांडला आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘लोकमत’च्या या मोहिमेचे तीव्र पडसाद सिडकोत उमटले. त्यानुसार सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेत संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत.पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पनवेल नगरपालिकेला १६४ वर्षांची परंपरा आहे. असे असले तरी परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रस्ते, वाहनतळ, आरोग्य सुविधा, तलाव, घनकचरा व्यवस्थापन, खेळाचे मैदान, उद्याने,पाण्याचे दुर्भिक्ष, विरंगुळा केंद्र, अग्निशमन यंत्रणा आदी अत्यावश्यक सेवा रसातळाला गेल्या आहेत. पनवेलबरोबरच सिडकोनिर्मित खारघर, कळंबोली आणि कामोठे या परिसरातही या सोयी-सुविधांची वानवा आहे. यासंदर्भातील सविस्तर लेखमाला ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात येत आहे. या वृत्तमालेचे तीव्र पडसाद पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यापाठोपाठ सिडकोनेही या वृत्तमालेची दखल घेतली आहे. मंगळवारी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कळंबोली, खारघर, पनवेल आणि कामोठे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच सिडकोचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. वृत्तमालेचा आधारे चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांची मते जाणून घेतली. त्या त्या विभागातील नागरी समस्यांचा आढावा घेतला. त्यानुसार येत्या काळात त्यांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. (प्रतिनिधी)