शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 02:22 IST

बेकायदा इमारतींना वीज, पाणी व इतर सुविधा देऊ नका, असे जाहीर आवाहन सिडकोच्या वतीने संबंधित शासकीय संस्थांना करण्यात आले होते.

नवी मुंबई : बेकायदा इमारतींना वीज, पाणी व इतर सुविधा देऊ नका, असे जाहीर आवाहन सिडकोच्या वतीने संबंधित शासकीय संस्थांना करण्यात आले होते. परंतु या संस्थांनी असहकाराची भूमिका दाखवत सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली दाखविल्याने भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. परिणामी शहरात आजही बिनदिक्कत नवीन बांधकामे सुरू असल्याचे दिसत आहे. सिडकोने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी २0१३ नतंरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या मे महिन्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली. परंतु विविध कारणांमुळे कारवाईला म्हणावी तशी गती देता आली नाही. नेमकी ही बाब भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने आजही मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे उभारली जात आहेत. वर्षभरात नवी मुंबईसह उरण व पनवेल तालुक्यात ५००पेक्षा अधिक नवीन इमारती उभारल्या गेल्या आहेत. त्यांना पाणी, वीज तसेच मलनिस्सारण वाहिन्या आदी सुविधांचीही पूर्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडकोची परवानगी नसलेल्या इमारतींना महापालिका व महावितरण या शासकीय संस्थांनी पाणी, वीज व इतर सुविधा देऊ नयेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले होते. सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण विभागाचे मुख्य नियंत्रक योगेश म्हसे यांनी संबंधित संस्थांना पाच महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु या संस्थांनी सिडकोच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवत नव्याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना वीज व पाणीपुरवठा तसेच इतर सुविधा पुरविल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे फावले आहे. १ जून २0१५ नंतर उभारलेल्या ५७८ नवीन बांधकामांना एमआरटीपी अ‍ॅक्ट कायद्याअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ४५0 बांधकामे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. या बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)