शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे खाडी पुलाच्या कठड्यांना तडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:48 IST

पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत उपाययोजना करण्याची मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीने केली आहे.पनवेल-सायन महामार्गावर कोपरा-कामोठे-कळंबोली दरम्यान खाडी आहे. त्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे. महामार्गावर महत्त्वाचा पूल असताना बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नाही. दोन वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने आता सुसाट वेगाने वाहने मुंबई-पुणे बाजूकडे धावतात. महत्त्वाचा महामार्ग असल्याने वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामध्ये हलक्याबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश असतो.महामार्गाचे रुंदीकरण करीत असताना पुलाची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. पूर्वी जे कठडे बांधण्यात आले आहेत ते जीर्ण झाले असून त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत.विशेष करून मुंबईहून पुण्याकडे जाणाºया मार्गिकेच्या कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. दुर्दैवाने एखाद्या वाहनाने धडक दिल्यास, संरक्षण कठडा खाडीत कोसळतील त्याचबरोबर संबंधित वाहनही खाली जाईल, इतके ते जीर्ण झालेआहेत. एकंदरीतच वाहनांनाअटकाव करण्याची क्षमता त्या कठड्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीचे अमोल शितोळे यांनी केली आहे.पुलाच्या जोडावर भेगाकामोठे खाडीवर दोन पुलावरील मार्गिका एकमेकांना जोडण्यात आलेल्या आहेत. हा जोड मजबूत नसल्याने वरच्या भागावर भेगा पडलेल्या आहेत. त्या अनेक दिवसांपासून तशाच आहेत. त्याबाबतही सा.बां. विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.