शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आघाड्यांनी तापवले कळंबोलीतील राजकारण

By admin | Updated: March 25, 2017 01:39 IST

पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार प्रभागांचा समावेश असलेल्या कळंबोली वसाहतीत आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे.

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीपनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार प्रभागांचा समावेश असलेल्या कळंबोली वसाहतीत आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये रोडपाली-कळंबोली विकास आघाडी व शेकाप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा समावेश आहे. भारतीय जनता पक्ष-रिपाइं युतीने सुद्धा कंबर कसली आहे. शिवसेनेनेकडूनही कळंबोलीत तयारी सुरू झाल्याने हळूहळू परिसरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कळंबोली वसाहतीत तीन प्रभाग झाले असून कळंबोली गावासह इतर काही भाग जोडून आणखी एक प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्र मांक ७ मध्ये रोडपालीचा बराचसा भाग समाविष्ट आहे. एकूण आठ सेक्टरचा समावेश असलेल्या या प्रभागात मार्बल मार्केटचाही समावेश आहे. चोवीस हजार लोकवस्ती आणि साडेसोळा हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. येथील कॉस्मोपॉलिटन मतदारांना एकत्रित करून त्यांच्यातून रोडपाली- कळंबोली विकास आघाडीने उमेदवार निश्चित केलेला आहे. या प्रभागात शेकाप-काँग्रेस, राष्ट्रवादीकडून चाचपणी करण्यात आलेली आहे. भाजपाकडून काहींना प्रोजेक्ट करण्यात येत आहे. शिवसेनेचा सुध्दा प्रभाग क्र मांक-७ मध्ये सर्व्हे सुरू झाला आहे. प्रभाग ८ मध्ये कळंबोली वसाहतीतील पाच सेक्टर आहेत. राजकीयदृष्ट्या हा प्रभाग प्रतिष्ठेचा होऊ लागला आहे. याचे कारण राजकीय नेत्यांच्या मुलांना येथून निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. इतर पदाधिकारी सुध्दा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या प्रभागात तिकीट मिळविण्याकरिता शेकाप-राष्ट्रवादी आघाडीबरोबर भाजपा व शिवसेना या पक्षांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. वसाहतीचा काही भाग तसेच गावांबरोबरच आसुडगाव, वळवली, टेंभोडे, खिडुकपाड्याचा समावेश असलेला प्रभाग ९ आहे. या ठिकाणी स्थानिक मतदारांचा प्रभाव असला तरी कळंबोली वसाहतीतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या प्रभागातून भविष्य आजमावण्यासाठी काही जण तयारीत आहेत. प्रभाग १० मध्ये चार सेक्टरचा समावेश आहे. येथे शेकाप, काँग्रेस राष्ट्रवादी, रोडपाली- कळंबोली विकास आघाडी, भाजपा, शिवसेनेने कंबर कसली आहे. कळंबोली वसाहतीत एकूण बारा नगरसेवक महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करणार आहे.