शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी ते उलवेदरम्यान तिसरा सागरी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:57 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. पामबीच व खारघर-बेलापूरनंतर आता जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा तिसरा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ५.८ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर २0२१ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर असतानाच विमानतळाला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीवरही सिडकोने भर दिला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान २२ किमी लांबीच्या मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी सिडकोने जेएनपीटी-उलवे दरम्यान १0.१0६ किलोमीटर लांबीचा नवीन सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग जेएनपीटी (बेलपाडा) येथून सुरू होणार असून पुढे जासई टेकड्यांच्या पायथ्याशी शिवाजीनगर येथील प्रस्तावित एमटीएचएलला जोडला जाणार आहे. येथून हा मार्ग उलवे किनारपट्टीवरून पुढे जाणार आहे. पनवेल खाडीवरील आम्रमार्ग हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असणार आहे. त्यामुळे जेएनपीटीला जोडणारा दुसरा जोडमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग-४बी आणि राज्यमहामार्ग -५४ वरून आम्रमार्गावर येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. दोन टप्प्यात हा सागरी मार्ग बांधण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. पहिला टप्पा आम्रमार्ग जंक्शन ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा १.२ किमी लांबीचा जोड रस्ता विकसित करण्यात येणार आहे.खारघर ते बेलापूरदरम्यान ९.५ किमी लांबीचा सागरी मार्ग (कॉरिडोर) उभारण्याचा निर्णय सिडकाने घेतला आहे. या कॉरिडोरसाठी २७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा मार्ग उलवे आम्रमार्ग येथे प्रस्तावित सागरी मार्गाला जोडला जाणार आहे. यापूर्वी सिडकोने वाशी ते बेलापूर दरम्यान १३ किमी लांबीचा पामबीच हा सागरी मार्ग बांधला आहे.