शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

जिल्ह्यातील टंचाईवर ‘जलक्रांती’चा उतारा

By admin | Updated: March 16, 2017 03:11 IST

जिल्ह्यात असलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती...एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे

आविष्कार देसाई , अलिबागजिल्ह्यात असलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती...एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. जिल्ह्यात बेसुमार पाऊस पडूनही नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. टंचाई कृती आराखड्याच्या रकमेवरून ते स्पष्ट दिसून येते. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जलक्रांती हा विशेष प्रकल्प २०१९पर्यंत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात जनतेचाही सहभाग अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी ६ कोटी २५ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ३७६ गावे आणि एक हजार १०९ वाड्या, अशा एकूण एक हजार ४७६ योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १२६ गावे आणि ३८६ वाड्यांमध्ये तब्बल ५१२ विंधण विहिरी (बोअरवेल) खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन २ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार आहे. अलिबाग, महाड आणि पोलादपूरमध्ये प्रत्येकी ५७ बोअरवेल खोदण्यासाठी ८७ लाख रुपये खर्च होणार आहेत. याच तीन तालुक्यांमध्ये टँकरनेही पाणीपुरवठा करण्यासाठी एकत्रित १ कोटी २७ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये या तीन तालुक्यांवर बेसुमार खर्च होणार आहेत. याच तालुक्यामध्ये जलक्रांतीसाठी विशेष प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. अन्य तालुक्यांमध्येही जलक्रांतीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड करणे, असे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यासाठी विविध संस्थांमार्फत कोट्यवधी रुपयांचा सीएसआर फंडही प्रशासनाच्या तिजोरीत जमा झालेला होता. पाण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाही पावसाचे प्रचंड प्रमाणातील पाणी अडविण्यात म्हणावे तसे यश आलेले दिसून येत नाही. त्यामुळेच प्रशासनाला डिसेंबरअखेर टंचाई कृती आराखडा आखून पाण्याचे दुर्भिक्ष दूर करावे लागते.पेण तालुक्यातील खारेपाट विभागासह म्हसळ््यामध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांतही थोडी अधिक पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्या माध्यमातून टंचाईवर मात करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते ही जमेची बाजू आहे.- एस. वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठातीन तालुक्यांतील जलक्रांती१अलिबाग : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची आठ कामे पूर्ण झाली आहेत. दगडी बांध-१, शेततळे-१ सिमेंटनाला बांध-१, सिमेंट बांध दुरुस्ती-१ वळण बंधारा-१, वन तलाव- १, जलशोषक चर-१ या सर्व कामांमुळे ५२ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.२महाड : गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची ७९ कामे पूर्ण झाली आहेत. सलग समतर चर- ४३, अनघड दगडी बांध-९, सिमेंटनाला बांध-८, जुनी भात शेती दुरुस्ती-९ वळण बंधारा-२, या कामांमुळे २११ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.३पोलादपूर : गेल्या दोन वर्षांमध्ये मृद व जलसंधारणाची ६६ कामे पूर्ण झाली आहेत. सलग समतर चर- २६, जुनी भातशेती दुरुस्ती-३३, या कामांमुळे ७२ टी.सी.एम. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.