शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

By admin | Updated: January 13, 2016 02:30 IST

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने २0१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षासाठी २८८ कोटी ७१ लाख १४ हजार जमेचा व २८८ कोटी ६६ लाख ९३ हजार रूपये खर्चाचा असा ५ लाख २१ हजार रूपये

नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने २0१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षासाठी २८८ कोटी ७१ लाख १४ हजार जमेचा व २८८ कोटी ६६ लाख ९३ हजार रूपये खर्चाचा असा ५ लाख २१ हजार रूपये शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.उपक्रमाने २0१५-१६ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या सर्व योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी चालू अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाचा मेळ बसविताना व्यवस्थापनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना याची खबरदारी घेवून जमा आणि खर्चाचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. आगामी वर्षाच्या अंदाजपत्राच्या जमेच्या बाजूत पीपीपी तत्त्वावर बस टर्मिनस विकसित करून पाच कोटी प्रवासी भाड्याद्वारे ९५ कोटी २७ लक्ष व इतर १५ कोटी १0 लाखांच्या महसूल गृहीत धरण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेकडून या आगामी वर्षात ५२ कोटींचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. विशेष म्हणजे जेएनएनयूआरएम प्रकल्प-२ अंतर्गत आगामी वर्षात परिवहन उपक्रमाला एकही रुपया मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी वर्षात परिवहन उपक्रमाने नवीन बसेस खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच खासगी सहभागातून बससेवा सुरू करण्यासाठी ६२ कोटी २७ लाख, आगार विकसित करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख, आस्थापन, कार्यशाळेवर १७ कोटी १२ लाख रुपये, ई गव्हर्नन्ससाठी ५ कोटी, हायब्रिड बस खरेदीसाठी ४ कोटी ८0 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. परिवहन उपक्रमाने सन २0१५-१६ चा चालू वर्षाचा ५५३ कोटी १६ लाख ८४ हजार रूपये खर्चाचा असा ९ लाख २३ हजार रूपये शिल्लकीच्या अर्थसंकल्पात सुधारणा करून तो १५ लाख ३४ हजार रूपये शिल्लकीचा करण्यात आला होता. त्याअनुषंगानेच उपक्रमाने आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी मंगळवारी हा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला. खासगी बस सुविधाखासगी कंत्राटदारामार्फत प्रवासी बसेस सुरू करण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून मागील दोन वर्षापासून चाचपणी सुरू आहे. आगामी अर्थसंकल्पात खासगी बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी ६२ कोटी २७ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच आगार विकसित करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.